आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका : चेतन मछले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:32+5:302021-05-13T04:39:32+5:30
खटाव : ‘कोरोनाशी एकीकडे सर्वांचाच लढा सुरू आहे. त्यातच आरक्षणाचा निर्णय आल्यामुळे सगळीकडेच वातावरण तणावपूर्ण आहे. अशातच डिजिटल मीडियावर ...
खटाव : ‘कोरोनाशी एकीकडे सर्वांचाच लढा सुरू आहे. त्यातच आरक्षणाचा निर्णय आल्यामुळे सगळीकडेच वातावरण तणावपूर्ण आहे. अशातच डिजिटल मीडियावर एकमेकांच्या भावना दुखावल्या जातील, अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकून तेढ वाढवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये’, असे आवाहन पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे.
खटावमधील मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या चर्चेत मछले यांनी युवकांना आरक्षण हा मुद्दा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु भावनेच्या आहारी जाऊन असे कोणतेही पाऊल उचलले गेले तर त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो आणि परिस्थिती अधिकच किचकट व गुंतागुंतीची होते. या परिस्थितीत कोणीही ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकणार नाही, याची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांची राहील. तसेच पोलीस ठाण्याचा एक प्रतिनिधी त्या ग्रुपमध्ये असेल त्या ग्रुपवरच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही यावेळी मछले यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, राहुल देशमुख, योगेश शिंदे, सचिन जगताप आदी उपस्थितीत होते.