ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दालने खुली -पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:05+5:302021-03-14T04:34:05+5:30
गोटे-मुंढे, ता. कऱ्हाड येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या प्रीतीसंगम विद्यालयात ए. व्ही. पाटील यांची जयंती व इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना पारितोषिक ...
गोटे-मुंढे, ता. कऱ्हाड येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या प्रीतीसंगम विद्यालयात ए. व्ही. पाटील यांची जयंती व इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, संस्था सचिव डी. ए. पाटील, बाजार समितीचे संचालक अशोक पाटील- पोतलेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, संस्था संचालक पी. टी. चव्हाण, रमण पाटील, अमित पाटील, जे. आय. इनामदार, अप्पासाहेब मगरे, महंमद आवटे, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, जी. बी. देशमाने, के. आर. साठे, ए. आर. मोरे, डी. पी. पवार यांची उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी ए. व्ही. पाटील हे अविरतपणे झटत राहिले. त्यामुळेच यशवंत शिक्षण संस्था नावारूपाला आली आहे.
सचिन नलवडे, अशोक पाटील, अप्पासाहेब मगरे यांनी मनोगत व्यक्त केले. ए. आर. मोरे यांनी स्वागत केले. संभाजी चव्हाण प्रास्ताविक केले. व्ही. बी. मोहिते यांनी सूत्रसंचालन केले, तर राजू अपिने यांनी आभार मानले.
फोटो : १३केआरडी०३
कॅप्शन : गोटे-मुंढे, ता. कऱ्हाड येथील प्रीतीसंगम विद्यालयात पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.