कोयनेचे दरवाजे चार फुटांनी उघडले, विसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:02 PM2018-08-16T20:02:11+5:302018-08-16T20:03:44+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत उचलून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा पाऊस जोर धरू लागला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत.
गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात १०९ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०२.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला. धरणात २९२६४ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे तीन फुटांवरून चार फुटापर्यंत उचलण्यात आले. दरवाजातून ३३८७९ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून ३५९७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गुरुवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.७५ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४६, बलकवडी ३.९९ तर तारळी धरणात ५.१० टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १५९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०४/५२०
कोयना १०९ /४३३५
बलकवडी ३९ /२१२०
कण्हेर ०२ /५१४
उरमोडी ०९/ ९८६
तारळी १२ /१८१७