कऱ्हाडात डोस ३८०; रांगेत हजारवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:04+5:302021-05-12T04:41:04+5:30
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सोमवारपासून लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोमवारीही लस घेण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. त्यावेळी वादावादीचीही ...
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सोमवारपासून लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोमवारीही लस घेण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. त्यावेळी वादावादीचीही घटना घडली. सोमवारचा अनुभव लक्षात घेऊन मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी केंद्रावर रांग लावण्यास सुरुवात केली. लसीकरण सुरू होईपर्यंत रांगेत थांबलेल्या नागरिकांची संख्या दोनशेवर पोहोचली. त्यानंतर काही वेळातच हा आकडा पाचशेवर पोहोचला. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात ३८० डोस उपलब्ध झाले होते. १८ ते ४४ व ४५ च्या पुढील वयोगटासह फ्रन्टलाइन वर्कर यांच्यासाठी ही लस उपलब्ध झाली होती. मात्र सकाळपासूनच या ठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू करण्यात आले. तर दुसरीकडे पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने सुरू असलेल्या टाऊन हॉलमधील लसीकरण केंद्रावर लसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांनी रांग लावली. मात्र, लसच उपलब्ध नाही, असे सांगण्यात आल्यानंतर अनेकांनी वाद घातला. टाऊन हॉलमधील लसीकरण केंद्र मंगळवारी दिवसभर बंद होते.
फोटो : ११केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.