मालमत्तेच्या वादातून आई आणि मोठ्या भावाचा 50 वार करून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 10:28 AM2018-04-09T10:28:19+5:302018-04-09T10:28:19+5:30

मालमत्तेच्या वादातून मुलाने सख्ख्या मोठा भाऊ व आईवर धारदार शस्त्रानं केले 50 हून अधिक वेळा सपासप वार

Double murder at Satara | मालमत्तेच्या वादातून आई आणि मोठ्या भावाचा 50 वार करून घेतला जीव

मालमत्तेच्या वादातून आई आणि मोठ्या भावाचा 50 वार करून घेतला जीव

Next

कऱ्हाड (सातारा) : मालमत्तेच्या वादातून मुलाने सख्ख्या मोठ्या भावासह आईवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे.  मलकापूर-आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीजवळील सोमवारी (9 एप्रिल) पहाटे ही धक्कादायक घटना घडली. हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश गजानन घोडके (वय 40 वर्ष) व जयश्री गजानन घोडके (वय 65 वर्ष) या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.  याप्रकरणी राकेश गजानन घोडकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीनजीक घोडके कुटुंब वास्तव्यास आहे.  गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबामध्ये मालमत्तेवरुन वाद सुरू होते. जयश्री घोडके यांचा धाकटा मुलगा राकेश हा मालमत्तेच्या कारणावरून आई व मोठा भाऊ राजेश यांच्याशी वाद घालायचा. सोमवारी पहाटेही याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी राकेशने त्याच्याजवळील धारधार शस्त्राने राजेश व आई जयश्री यांच्यावर वार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा ऐकू येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली.

त्यावेळी राजेश व जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने ही माहिती कऱ्हाड शहर पोलिसांना दिली. पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी पाहणी केली असता राजेश व जयश्री यांच्यावर पन्नासहून अधिक वार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी संशयित राकेश घोडके याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव घटनास्थळी तपास करीत आहेत.

Web Title: Double murder at Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून