सातारा-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक डबल करा

By admin | Published: January 30, 2015 09:29 PM2015-01-30T21:29:31+5:302015-01-30T23:14:53+5:30

उदयनराजे : रेल्वेच्या बैठकीला खासदारांची उपस्थिती

Double track the Satara-Kolhapur railway track | सातारा-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक डबल करा

सातारा-कोल्हापूर रेल्वे ट्रॅक डबल करा

Next

सातारा : सातारा रेल्वे स्टेशनचे अद्यावतीकरण करावे, रेल्वेस्टेशनवर महिलांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय बांधावे, सातारा ते कोल्हापुर डबलट्रॅक करावा, कऱ्हाड-चिपळूण नवीन लोहमार्ग विकसीत करावा, सातारा जिल्ह्यातील मसूर, रहिमतपुर आणि वाठार येथे रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत आदी प्रमुख मागण्यांसह रेल्वे प्रशासन गतीमान आणि सक्षम करण्याबाबतच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील संसद सदस्यांच्या बैठकीत केल्या.बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते-पाटील, संजय पाटील, दिलीप गांधी, डॉ. हुसेन गायकवाड, सदाशिव लोखंडे,रेल्वेचे मुख्यमहाव्यवस्थापक सुद, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनीत शर्मा आदी उपस्थित होते.भारताच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये भारतीय रेल्वेचे अच्युत योगदान आहे. प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीमध्ये रेल्वेची भूमीका महत्वाची आहे. रेल्वे सुविधांचे जाळे निर्माण केल्यास व्यापार, उद्योगाला लाभदायक होनाण आहे. म्हणूनच अधिकाधिक कार्यक्षम आणि सुरक्षित रेल्वे सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगूण उदयनराजे म्हणाले, ९२० कोटी रुपयांचा व सुमारे १११ किमी लांबीचा चिपळूण-खेरडी-कोयनानगर-पाटण-कऱ्हाड असा नवीन लोहमार्ग प्रस्ताव २०१० साली रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.
तो पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापुर या दरम्यान आता असलेल्या सिंगल रेल ट्रॅक ऐवजी डबल रेल ट्रॅकची उभारणी करावी, त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या सुविधा संख्येत आणखी वाढ होईल असेही उदयनराजे म्हणाले.
यावेळी सुनीत शर्मा, अशोक सावंत, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भरत देशमुख, जितेंद्र खानविलकर, आदींसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Double track the Satara-Kolhapur railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.