कबुतरे आकाशात सोडून शांतिदूत पुतळा बसविण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:45 PM2018-02-14T23:45:38+5:302018-02-14T23:45:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदुताचा पुतळा हटवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लोकभावनेचा आदर करत होता त्याच जागेवर पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी संदीप पाटील यांच्यासह समस्त सातारकरांच्या वतीने १८ कबुतरे आकाशात सोडून पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ केला.
पोलीस मुख्यालयासमोरील साताºयाचा लाडका शांतिदूत पक्षी गुरुवारी रात्री हटविण्यास सुरुवात केली. हा पुतळा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर कोल्हापूरला हलविण्यात येत असल्याचे समजताच सातारकांना धक्काच बसला. काहींनी पुतळा हटवण्याचे काम थांबवून ठिय्या आंदोलन केले. तसेच अनेकांनी पोलीस प्रशासनावर तीव्र टीका केल्यानंतर पोलिसांनी पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी तो पोलीस परेड मैदानात बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.
दुसºया दिवशी पुन्हा घुमजाव करत प्रशासकीय बाब म्हणून हा पुतळा मुख्यालयाच्या मागील बाजूस मैदानात बसविला जाईल, असे सांगण्यात आले. सातारकरांच्या आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत लोकभावनेचा आदर करत पुतळा होत्या त्या जागी बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी विविध संघटना आणि त्यांचे पदाधिकारी पोलीस मुख्यालयासमोर जमले. त्यांनी संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्यासह सातारकरांनी १८ कबुतरे आकाश सोडली. तसेच साखर, पेढे वाटून पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक करण्यात आले. येत्या काही दिवसांत हा शांतिदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ढाबळीतून आणली अठरा कबुतरे...
साताºयाचा लाडका पक्षी आझाद झाल्याचा संदेश देण्यासाठी शिंदे नामक एका सातारकराने कबुतराच्या ढाबळीतून १८ कबुतरे आणली होती. ती कबुतरे मुख्यालयासमोर शांतिदूत पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी पोलीस अधीक्षक व सातारकरांच्या हाती देऊन आकाशात सोडली.