रमाईच्या त्यागातून डॉ. आंबेडकर घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:18+5:302021-02-14T04:37:18+5:30

सातारा : ‘परिस्थितीशी झुंजत, झगडत आणि वेदना, यातनांचे डोंगर तुडवत रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. त्यामुळेच ...

Dr. Ramai's sacrifice. Ambedkar happened | रमाईच्या त्यागातून डॉ. आंबेडकर घडले

रमाईच्या त्यागातून डॉ. आंबेडकर घडले

googlenewsNext

सातारा : ‘परिस्थितीशी झुंजत, झगडत आणि वेदना, यातनांचे डोंगर तुडवत रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. त्यामुळेच डॉ. आंबेडकर घडले अन् भारतीय समाजाच्या, राष्ट्राच्या उन्नतीच्या उभारणीसाठी ते महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकले. क्रांतीचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर घराघरातील स्त्रियांनी रमाई झाले पाहिजे. जर तसे झाले तर आंबेडकरांची विचार चळवळही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे विचार साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.

प्रतापसिंहनगर येथे रिपब्लिकन पार्टी आॉफ इंडियाच्या (ए) वतीने दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा जयंती महोत्सव पार पडला. यामध्ये आदर्श माता रमाई आंबेडकर पुरस्कार भागाबाई वसंत ओव्हाळ यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी नितीन चंदनशिवे, गझलकार वसंत शिंदे यांची उपस्थिती होती.

नितीन चंदनशिवे यांनी पुतळ्याजवळची गर्दी पुस्तकाकडे कशी वळवता येईल यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. युवकांना शैक्षणिक प्रवाहात आणून प्रशासनातील अधिकारी कसे बनवता येईल यावर आपण भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय चळवळीतील काही दाखले देत चंदनशिवे यांनी कविता म्हटल्या. वसंत शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गजल सादर केली.

यादरम्यान मदन खंकाळ, विक्रम वाघमारे, किरण ओव्हाळ, उत्तमराव गायकवाड, नरेश बोकेफोडे आदींना गौरवचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी लक्ष्मी ओव्हाळ, लताबाई भोसले, साखराबाई भोसले, मीराताई ओव्हाळ, बुद्धमिता गव्हाळे, आम्रपाली कदम, दत्तू ओव्हाळ, बाबा ओव्हाळ, राजू ओव्हाळ, संजय नीतनवरे, रफिक मुलाणी, संदीप जाधव, वैभव गायकवाड यांच्यासह प्रतापसिंहनगर व परिसरातील बांधव उपस्थित होते.

फोटो आहेत...

१३पुरस्कार

प्रतापसिंहनगर येथील महोत्सवात रमाई आंबेडकर पुरस्कार भागाबाई वसंत ओव्हाळ यांना प्रदान करण्यात आला.

Web Title: Dr. Ramai's sacrifice. Ambedkar happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.