भुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार करा - सातारा पालिका सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:51 AM2019-01-24T00:51:32+5:302019-01-24T00:56:23+5:30
पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. सातारकरांसाठी ते लाभदायक कमी अन् त्रासदायक अधिक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या
सातारा : पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. सातारकरांसाठी ते लाभदायक कमी अन् त्रासदायक अधिक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. याबाबत बैठक आयोजित करून कामाचा आढावा घेऊ, अशी ग्वाही नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिली.
पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुुधवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक वसंत लेवे, अशोक मोने, धनंजय जांभळे यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पुणे येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या साताºयातील खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त मांडल्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वीकृत नगरसेवक अविनाश कदम यांना सभेला बसता येते की नाही, त्यांचे नाव राजपत्रात आहे की नाही याचा खुलासा करण्याची मागणी केली. या विषयावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. अविनाश कदम यांनी जिल्हाधिकाºयांचे पत्रच पीठासन अधिकाºयांपुढे ठेवून आपल्याला सभेला बसण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे निदर्शनात आणून देताच या विषयावर पडदा पडला.
यानंतर शहरातील भुयारी गटार योजनेचा मुद्दा चर्चेला आला. विविध प्रभागांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. कामात अनेक त्रुटी असून, खोदलेला रस्ताही पुन्हा बंदिस्त केला जात नाही. हे काम झाल्यानंतर ड्रेनेजसाठी पुन्हा खोदकाम करावे लागणार आहे. विरोधी पक्ष नेता अशोक मोने, भाजप नगरसेविका सिद्धी पवार, सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. अखेर सभागृहाने केलेल्या मागणीनुसार पालिका आणि संबंधित ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला जाईल, हे काम अधिक दर्जेदार व गतीने केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
पालिकेतील बंद वाहनांचा लिलाव करणे, कांगा कॉलनीत मेडिटेशन हॉल बांधणे, सदर बझार शॉपिंग सेंटर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे, शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, कोटेश्वर मंदिर ते गेंडामाळ रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करणे, केसरकर पेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करणे, बसप्पा पेठ, भोसले नगर तोडकर कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे, सोनगाव कचरा डेपोतील प्रक्रिया शेडसाठी अॅप्रोच रस्ता तयार करणे तसेच ट्रान्सफॉर्मर, पोल व दिवे बसविणे यासह वीस विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्षा माधवी कदम यांचा आक्रमक पवित्रा प्रथमच सभेच्या निमित्ताने सर्वांना अनुभवयास मिळाला. त्या म्हणाल्या, ‘काही नगरसेवक सभेत बोलताना विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून स्वत: प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. वाट्टेल ते आरोप करतात. हे कृत्य कदापि सहन करणार नाही.
मत मांडण्यास संधी द्यावी : जांभळे
सभा संपल्यानंतर प्रत्येकाने आपले मत मांडावे, सभेचा वेळ कोणीही वाया घालवू नये, अशी भूमिका नगराध्यक्षा माधवी कदम यांनी घेतली. याला नगरविकास आघाडी व भाजपच्या नगरसेकांनी जोरदार विरोध दर्शविला. भाजप नगरसेवक धनंजय जांभळे व अशोक मोने यांनी नगराध्यक्षांना प्रत्येकाला बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ द्यावा, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत नगराध्यक्षांनी सर्वांना मते मांडण्यासाठी वेळ दिला.
दरम्यान, कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेच असलेले नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनाही ‘सभागृहाचे नियम पाळून बोलावे, तुमचे शब्द नेहमीच घसरतात. मला कारवाईला भाग पाडू नका,’ असा सज्जड इशारा त्यांनी दिला. पालिकेच्या आजपर्यंत झालेल्या सभेत प्रथमच नगराध्यक्षांचे हे आक्रमक रूप पाहावयास मिळाले.
वाचनालयासाठी मतदान
मंगळवार पेठेतील वाचनालयाचा मुद्दा सभेत चर्चेला ठरला. वाचनालयातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली समिती बेकायदेशीर असल्याचा आरोप नगरसेवक अविनाश कदम यांनी केला. परंतु सत्ताधारी आपल्या मतावर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपानंतर या विषयासाठी मतदान घेण्यात आले. अखेर १९ विरुद्ध १० अशा मतांनी सत्ताधाºयांनी हा ठराव मंजूर केला. त्यामुळे मंगळवार पेठेतील वाचनालय नवीन व अनुभवी संस्थेद्वारे चालविले जाणार आहे.