सुपने तीन दिवस कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:17+5:302021-04-28T04:43:17+5:30
सध्या सुपने गावात ४७ बाधित आहेत. त्यापैकी ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे ...
सध्या सुपने गावात ४७ बाधित आहेत. त्यापैकी ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे तर ३४ जण गृहविलगीकरणात आहेत. ही कोरोनाची साखळी वाढण्यासाठी गावातील सार्वजनिक कार्यक्रम कारणीभूत असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य यंत्रणा तसेच ग्रामपंचायत यांनी साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावात विनामास्क तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
केवळ मेडिकल आणि दवाखान्यांत जाणाऱ्या नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. बाकी सर्वांना कडक लॉकडाऊन आहे.
सुपने गावात साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावात प्राथमिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने ४५ पुढील नागरिकांचे लसीकरण चालू असून सध्या १ हजार ६०० जणांना लस देण्यात आली आहे.
कोट:-
गावात तीन दिवस मेडिकल व दवाखाने केवळ चार तास चालू राहतील. इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच या काळात बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर, कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
अशोक झिब्रे
सरपंच सुपने