तहानलेल्या पक्ष्यांसाठी वाईतील तरुणांकडून पसरणी घाटात पाण्याची सोय

By admin | Published: April 2, 2017 04:44 PM2017-04-02T16:44:17+5:302017-04-02T16:44:17+5:30

पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी झाडांना पाण्याच्या कुंड्या बांधण्याचा उपक्रम

Drinking water from thirsty youth for thirsty birds | तहानलेल्या पक्ष्यांसाठी वाईतील तरुणांकडून पसरणी घाटात पाण्याची सोय

तहानलेल्या पक्ष्यांसाठी वाईतील तरुणांकडून पसरणी घाटात पाण्याची सोय

Next

आॅनलाईन लोकमत

वाई , दि. २ : अलीकडच्या काही दिवसांत अचानक उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई वाढली असून, दुष्काळी पट्ट्यात न येणाऱ्या परिसरात ही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे़ दुष्काळाचा जास्त परिणाम हा प्राणी, पक्षी यांच्यावर जास्त होत असतो़ पाण्यासाठी दाहीदिशा त्यांना वणवण फिरावे लागते़ अशा वेळी पाण्याच्या शोधात असताना त्यांची शिकार होण्याची शक्यता जास्त असते़ तरी ही आपला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी फिरावेच लागते़ यासाठी पर्यावरण पे्रमी, नागरिक पशूपक्ष्यांसाठी आपापल्या परिने पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत़ अशाच प्रकारे गंगापुरी वाई येथील भगवा कट्टा प्रतिष्ठान, सुयश प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या प्रतिनिधींनी गेली अनेक वर्षे पसरणी घाटात पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी झाडांना पाण्याच्या कुंड्या बांधण्याचा उपक्रम राबविला आहे़


गतवषीर्चा पावसाळा समाधानकारक असताना देखील कडक उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईचे संकट आवासून उभे राहिले आहे़ आत्तापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे व ऐन उन्हाळ्यात ती प्रकषार्ने जाणवणार आहे. मग आधीच आपल्यापासून दूर चाललेल्या पशू व पक्ष्यांची हालत बघायलाच नको. मग या छोट्या जिवांसाठीही आपण काहीतरी केलेच पाहिजे या भावनेतून भगवा कट्टा मित्र परिवाराच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पसरणी घाटात अनेक ठिकाणी झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली असून, सकाळ व संध्याकाळी घाटात फिरायला येणारे तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी दर दोन-तीन दिवसांनी या भांड्यांमध्ये पाणी ओतण्याची जबाबदारी घेतली आहे़ सध्या भगवा कट्टा मित्र समूहाच्या वतीने तीस झाडांवर पक्ष्यांसाठी भांडी लावण्यात आली आहेत़ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भैया संकुडे, चेतन एरंडे, प्रकाश नेमाडे, सचिन नवघणे, दिलीप कदम, जय संकुडे, धनंजय घोडके यांनी परिश्रम घेतले़


आपण निसगार्चा एक घटक आहोत आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबविला आहे़ तरी वाई शहर व परिसरातील नागरिकांनी आपापल्या इमारतीच्या टेरेसवर, परिसरातील झाडांवर, गॅलऱ्यांमध्ये वरील प्रमाणे निसगार्चा समतोल साधणाऱ्या छोट्या जिवांसाठी पाण्याची सोय करावी़ आम्ही भगवा कट्टा प्रतिष्ठान तर्फे पक्ष्यांसाठी अशी भांडी उपलब्ध करून वाईतील शाळांमधील मुलांना मोफत देणार आहोत़
- भैय्या सकुंडे,
भगवा कट्टा प्रतिष्ठान

Web Title: Drinking water from thirsty youth for thirsty birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.