कृषी उत्पन्न वाढीसाठी मागणाऱ्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:50+5:302021-09-27T04:42:50+5:30

सातारा : ‘कृषी उत्पन्न वाढणे तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली जमीन ठिबक सिंचनाखाली आणावी. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला ...

Drip irrigation to farmers seeking increase in agricultural income | कृषी उत्पन्न वाढीसाठी मागणाऱ्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

कृषी उत्पन्न वाढीसाठी मागणाऱ्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

Next

सातारा : ‘कृषी उत्पन्न वाढणे तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली जमीन ठिबक सिंचनाखाली आणावी. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल,’ अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

किन्हई, ता. कोरेगाव येथे पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करताना कृषिमंत्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, शिवसेनेचे प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहुल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, ‘सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी आणि महिला बचत गटांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठीही कृषी विभागाच्या ३० टक्के योजना आहेत. त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा होता. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने या योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाहीही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेततळे घेऊन मत्स्य शेती करावी. त्यातून चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते.

यावेळी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

फोटो दि.२६सातारा किन्हई फोटो...

फोटो ओळ : किन्हई, ता. कोरेगाव येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आदी उपस्थित होते.

.....................................................

Web Title: Drip irrigation to farmers seeking increase in agricultural income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.