चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कारची एसटीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:37 AM2021-03-24T04:37:43+5:302021-03-24T04:37:43+5:30
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कुरुंदवाड ही एसटी बस (एम. एच. ११, टी ९२८९) ही मंगळवारी पुणे स्टेशनवरून प्रवासी घेऊन कुरूंदवाडला ...
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कुरुंदवाड ही एसटी बस (एम. एच. ११, टी ९२८९) ही मंगळवारी पुणे स्टेशनवरून प्रवासी घेऊन कुरूंदवाडला निघाली होती. पुणे-बंगळूर महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास वनवासमाची हद्दीत आली असता कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव कार (एम. एच. ०४, इटी ८०१९) च्या चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात पुढे जात असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरात धडक दिली.
या धडकेत कारमधील एका महिलेसह तिघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अमित पवार, दस्तगीर आगा, अमोल भिसे, अजित भोसले, योगेश पवार, भाऊसाहेब यादव, महेश होवाळ तातडीने अपघातस्थळी दखल झाले. अपघाताची माहिती तळबीड पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.