कट्ट्यांची सोडत; ‘मंडईतला गोंधळ बरा होता!’

By Admin | Published: October 28, 2014 11:49 PM2014-10-28T23:49:02+5:302014-10-29T00:09:59+5:30

प्रचंड गदारोळ : प्रतापसिंह महाराज भाजी व फ्रूट मार्केटमध्ये ‘बिनभाजीची मंडई’

Drops; 'Mandela was a mess!' | कट्ट्यांची सोडत; ‘मंडईतला गोंधळ बरा होता!’

कट्ट्यांची सोडत; ‘मंडईतला गोंधळ बरा होता!’

googlenewsNext

सातारा : राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज भाजी मंडई व फ्रूट मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटपाची सोडत प्रचंड हलकल्लोळात पार पडली. कट्टे मिळण्याची साशंकता विक्रेत्यांना सतावत होती. याच साशंकतेमुळे त्यांचा गोंधळ अखेरपर्यंत सुरु होता. अनेकवेळा शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ८३ विक्रेत्यांना गाळे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, शिवाजीराव पवार, मंडई विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी विक्रेते सुमारे १२ वाजल्यापासूनच उपस्थित होते. विक्रेत्यांनी सुरुवातीपासूनच गोंधळ घातल्याने या सोडतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मुख्याधिकाऱ्यांनी सोडतीच्या सुरुवातीलाच ३३ ते ३७ व ८0 ते ८४ क्रमांकाच्या कट्ट्यांचा लिलाव होणार नसल्याचे स्पष्ट केले. हे कट्टे शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित १२३ कट्ट्यांमध्ये सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. पालिकेकडे नोंदविलेल्या ८३ विक्रेत्यांची नावे एका बॉक्समध्ये आणि दुसऱ्या बॉक्समध्ये कट्ट्यांचे नंबर होते. उपस्थितांमधील वयस्कर महिलांनी दोन्ही बॉक्समधील एक-एक चिठ्ठी उचलून सोडत पार
पडली. (प्रतिनिधी)
मेढा८.०५
पारगाव-खंडाळा५.३५
वडूज७.६१
विभागाचे एकुण१,०९,५९,०००
पदाधिकारी-अधिकाऱ्यांसमोर गोंधळ
राजवाडा मंडईतील कट्टे वाटपाचा कार्यक्रम अनेक दिवस रखडला होता. ८३ विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंद होती. त्यांचाच कट्टे वाटपाच्या सोडतीमध्ये सहभाग घेण्यात येणार होता. मात्र, सोडतीवेळी अनेक भाजी विक्रेते गोळा झाले. मुख्याधिकाऱ्यांनी सूचना करुन देखील विक्रेत्यांचा दंगा सुरुच होता. मंडईमध्ये माल विकताना जसा आवाज काढला जातो. तसाच आवाज याठिकाणीही सुरु होता. सोडतीवेळी पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर ही बिन भाजीची मंडईची भरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेकवेळा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सूचना करुन शांत राहण्याचे आवाहन करायला लागले.
राजवाडा येथील भाजी मंडई व फ्रूट मार्केटमधील कट्टे वाटपाची सोडत अत्यंत पारदर्शीपणे राबविली आहे. पहिल्यापासून जे याठिकाणी बसतात. त्यांनाच कट्टे वाटप झाले आहे. आणखी कट्टे उरले आहेत, त्याची सोडतही काही दिवसांनी काढण्यात येणार आहेत. रोजची पावती सोबत जोडून पालिकेकडे रीतसर अर्ज करणाऱ्यांना कट्टे वाटप केले जाईल.
जाईबाई कोकरेंच्या डोळ्यांत आश्रू
मंडईतील कट्ट्यांची सोडत काढली जात असताना प्रचंड गोंधळ सुरु होता. अनेक वर्षांपासून या मंडईत बसून विक्री करणाऱ्या बाया-बापड्या यावेळी जमल्या होत्या. यापैकी बहुतांश महिला वयस्कर असल्याने त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवर आणि पाणीदार डोळ्यांमध्ये साशंकता आणि उत्सुकतेचे भाव पाहायला मिळाले. अनेक वर्षे इथे भाजी विक्री केली, आता नवीन मार्केट बांधल्यानंतर येथील जागा आपल्याला मिळेल का?, अशी भीतीही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सर्वप्रथम जाईबाई कोकरे यांचे नाव पुकारले. १0१ नंबरचा कट्टा त्यांना मिळाला तेव्हा जाईबाईंच्या मुखावर हासू तरळले.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी

पालिकेने सोडतीद्वारे ८३ भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लावला. मात्र, आणखी बरेचसे विक्रेते आपल्याला कट्टा मिळाला नसल्याने नाराज होते. त्यांनी सोडतीनंतर गोंधळ घातला. पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष सोडतीनंतर वाहनात बसल्यानंतर विक्रेत्यांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन आमचे काय करणार? याबाबत जाब विचारला.काहींना ज्यादा गाळा मिळाले, आम्हाला एकही नाही, अशी तक्रारही त्यांनी मांडली. माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्यापुढेही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Drops; 'Mandela was a mess!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.