आटणीत दुष्काळी; कलाकुसरीत बंगाली...
By admin | Published: March 24, 2015 09:59 PM2015-03-24T21:59:12+5:302015-03-25T00:46:51+5:30
सोन्यासारखं जीवन : श्रीलंका, दुबईमध्येही गलाई व्यवसायिक
सोने म्हटले की समोर येते ते सोनार समाज व शोरुमवाले विक्रेते. पण, सोने शुध्द करणे व त्यापासून दागिने बनविणारेही तितकेच महत्वपूर्ण असतात. सोने शुध्द करण्यात सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोक आहेत. त्यालाच आपण आटणी (गलाई) व्यवसायिक म्हणतो. तर कलाकूसर दागिने बनविण्यात पश्चिम बंगालचे कारागिर पुढे आहेत. आजच्या स्थितीत देशात काय किंवा परदेशातही आटणी व्यवसायात दुष्काळी भागातीलच लोक आहेत. साताऱ्यातील माण खटाव तालुक्यातील अनेकांनी यात जम बसविला आहे. सांगली जिल्ह्यातील आटणी व्यावसायिक श्रीलंका, दुबईमध्येही कार्यरत आहेत. सोने-चांदीचा व्यवसाय शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सोन्याच्या दागिन्याचा भल्याभल्यांना मोह आहे. सोन्यापासून दागिने बनविताना ते शुध्द करुन घ्यावे लागते. म्हणजेच त्याला सोने रिफायनरी म्हणतात. ग्रामीण भागात त्याला आटणी म्हणून ओळखले जाते. देशात किंवा परदेशातही आटणी व्यावसायिक पसरला आहे. हा व्यावसायिक हा फक्त दुष्काळी भागातील आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका, सातारा जिल्ह्यात तर २०० च्यावर आटणी व्यावसायिक कार्यरत आहेत तर सातारा शहरात किमान ३० जण आहेत. आटणी व्यावसायिक मजुरीवर काम करतात. त्यांना टक्केवारीनुसार पैसे मिळतात. सोन्याची टक्केवारी काढणे, सोने शुध्द करणे यानुसार त्यांना पैसे मिळतात. आटणीच्या व्यावसायासाठी दगडी कोळसा, अॅसिड आणि नवसागर लागते. सातारा जिल्ह्यात असे कारागिर हजारभर आहेत. वर्ष, दोन वर्षांतून ते बंगालला जातात.
आटणी व्यावसायिकांची
काही प्रसिध्द गावे...
आटणी व्यावसायात दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे आहेत. या व्यावसायामुळे त्यांच्या गावांची नावे प्रसिध्द झाली आहेत. यामध्ये माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी. खानापूर तालुक्यातील पारे, वेजेगाव, भूड, जाधववाडी, मंगरूळ, रेवणगाव, बेनापूर, बलवडी (खानापूर), चिंचणी. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, करगणी, माडगुळे, तडवळे, नेलकरंजी. तसेच तासगाव ताुलक्यातील अनेक गावांतील लोक या व्यवसायात आहेत. एवढेच काय खानापूर तालुक्यातील काहीजण तर श्रीलंका, दुबई, अंदमान निकोबार येथे आटणी व्यावसाय करीत आहेत.