दुष्काळानं ठोठावलं जिल्ह्याचं पूर्वद्वार!

By Admin | Published: August 30, 2015 09:57 PM2015-08-30T21:57:33+5:302015-08-30T21:57:33+5:30

पाणीटंचाईच्या तीव्र झळा : विहिरींनी गाठला तळ; तलावही पडले कोरडे, टँकर सुरू करण्याची मागणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर --धरणांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ

Drought is the east gate of the district! | दुष्काळानं ठोठावलं जिल्ह्याचं पूर्वद्वार!

दुष्काळानं ठोठावलं जिल्ह्याचं पूर्वद्वार!

googlenewsNext

सातारा : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसानं पाठ फिरविल्यानं जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. विहिरींनी तळ गाठलाय, तर ठिकठिकाणचे तलाव कोरडे पडू लागलेत. उन्हाच्या तडाख्यानं पिकं करपू लागली आहेत, काही ठिकाणी शेतजमीन भेगाळू लागलीय. भरपावसाळ्यातच दुष्काळानं असा खेळ मांडल्यानं बळीराजा पुरता हतबल झालाय. प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून उपाययोजना आखायला हव्यात.
आठ दिवसातून एक वेळ पाणी---सद्य:स्थितीत या भागातील देऊर, वाठार स्टेशन, विखळे, तडवळे, तळिये या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या गावांना आठवड्यातून एकवेळ पाणीपुरवठा होत असून ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात या गावांचा पाणीप्रश्न कसा सुटणार, हाच या भागाचा प्रश्न आहे.
प्रस्ताव देऊन अपुरी टँकर व्यवस्थाकोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांनी पाणीटंचाईबाबत ग्रामसभा घेऊन प्रशासनाकडे पाण्याचे टँकर सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा करत दोन गावांत आठवड्यातून एक टँकर असे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.


मूर्ती विसर्जनाचा प्रश्न
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मोठ्या मूर्ती येथील आकर्षण असतात. यंदा तलाव कोरडे पडू लागल्याने मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा मोठा प्रश्न मंडळांपुढे आहे.

Web Title: Drought is the east gate of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.