दुष्काळी माण झाला टँकरमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:37 AM2021-03-19T04:37:41+5:302021-03-19T04:37:41+5:30

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात गेेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस झाला असून, अद्यापही सर्वच पाणवठे ओलेचिंब आहेत, तर काही काठोकाठ पाण्याने ...

Drought-free tanker-free! | दुष्काळी माण झाला टँकरमुक्त!

दुष्काळी माण झाला टँकरमुक्त!

Next

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात गेेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस झाला असून, अद्यापही सर्वच पाणवठे ओलेचिंब आहेत, तर काही काठोकाठ पाण्याने भरलेले असल्याने, निम्मा मार्च महिना संपला तरी एकाही गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव शासनदरबारी दाखल झाला नसल्याने, यंदाचा उन्हाळा माणवासीयांना सुसह्य जाणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्यातील तब्बल साडेअकरा हजार गावांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई, गतवर्षापासून पर्जन्यमान वाढू लागल्याने कमी होत चालल्याचे दिसून येत असतानाच, कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील काही गावे व वाडी-वस्त्यांवर गेल्या वर्षापर्यंत रात्रं-दिवस टँकरची घरघर सुरू होती. मात्र, गेेल्या वर्षापासून चांगल्याप्रकारे झालेल्या पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पाण्याची कमतरता तालुक्यात कोठेही जाणवली नसल्याने शासनाचाही दररोजचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.

ग्रामसमृद्धीसाठी असलेल्या शासकीय योजना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने योग्यप्रकारे राबविल्या तर काय बदल घडून येऊ शकतो, हे माण तालुक्यातील जलसंधारणाच्या झालेल्या कामांवरून दिसून येते. गावोगावच्या शिवारात पानी फाैंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी गट, तट, पक्ष-पार्टी बाजूला ठेवून एकजुटीने केलेल्या कामाचं चांगलं फलित सध्या पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी गावा-गावात असलेली भीषण पाणीटंचाई, तहान भागविण्यासाठी रात्रं-दिवस टँकरने होणारा पाणीपुरवठा आता बंद होऊन, माण तालुका सध्या टंचाई व टँकरमुक्त झाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गावोगावची पाणी समस्या कायमची निकाली काढण्यासाठी तलाव, ओढे-नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासाठी जी जलसंधारणाची कामे झाली होती. त्यात गेेल्या दोन वर्षांत पडलेल्या पावसाने संपूर्ण कामे उपयोगात आली, तर टेंभू, उरमोडी आणि तारळी उपसा योजनेतून दोनवेळा माण तालुक्यातील पिंगळी, ढाकणी, गंगोती, लोधवडेसह महाबळेश्वरवाडीचा तलाव भरून निघाल्यामुळे गावाच्या ओढ्यावरील साखळी बंधारे, नालाबांध, विहिरी, ओढ्या-नाल्यात अद्यापपर्यंत चांगले पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आणि विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावली. त्याचा फायदा होऊन, यंदा कायम दुष्काळी माण तालुका टँकरमुक्त झालेला दिसून येत आहे.

कोट :

गेल्या तीन वर्षांपासून माण तालुक्यातील गावोगावी पाण्यासाठी लोकसहभागातून झालेली जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरली आहेत. समतल चर, सीसीटी, बंधाऱ्यांंचे खोलीकरण, ओढ्या-नाल्यांंचे रुंदीकरण ही महत्त्वाची कामे करण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून केलेले श्रमदान महत्त्वाचे ठरले. त्याचेच फलित म्हणून आजमितीला माण तालुका टँकरमुक्त झाल्याचा आनंद होत आहे. नागरिकांनी वृक्षलागवड करून पर्यावरणपूरक वातावरण टिकवले पाहिजे.

- डॉ. नितीन वाघमोडे, आयकर आयुक्त

१८ढाकणी

फोटो : ढाकणी येथील तलावातून माण तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. सध्या या ठिकाणी पाणीच पाणी आहे.

Web Title: Drought-free tanker-free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.