औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:21+5:302021-05-28T04:28:21+5:30
कऱ्हाड : कालेटेक (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीकडून गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात सरपंच अॅड. पंडितराव ...
कऱ्हाड : कालेटेक (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीकडून गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात सरपंच अॅड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, ग्रामस्थही त्याला प्रतिसाद देत आहेत.
कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
दुभाजकात गवत
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. दुभाजकातील झाडे वाळली आहेत तर गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
रस्ता खड्ड्यात
कऱ्हाड : कार्वे-कोरेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे पडले की, त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. सध्या रस्त्याची अवस्था बिकट असून, रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.