कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदगावात औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:37 AM2021-05-26T04:37:53+5:302021-05-26T04:37:53+5:30
नांदगाव ता. कराड येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत चालली आहे. तर त्यामुळे काहींचे निधनही झाले आहे. या ...
नांदगाव ता. कराड येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत चालली आहे. तर त्यामुळे काहींचे निधनही झाले आहे. या साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संक्रमण थोपविण्याचे उद्देशाने गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणीचा उपक्रम राबवला.
उपक्रमाची सुरुवात ग्रामदैवत रघुनाथ महाराज मंदिर व परिसरात औषध फवारणी करुन झाली. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे,माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर यांच्या हस्ते फवारणी करण्यात आली .यावेळी जगन्नाथ माळी, सतीश कडोले, जगन्नाथ पाटील, भगवानराव पाटील, विलास पाटील, सोनाप्पा पाटील, गौरीहर तांबेकर, शिवाजी माळी, मारुती जंगम, दीपक मुळीक, रघुनाथ मोहिते आदींची उपस्थिती होती.
गावातील सर्व मंदिरे, शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय,पोस्ट कार्यालय,पोलीस औट पोस्ट येथेही औषध फवारणी करण्यात आली. औषध फवारणीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो
नांदगाव (ता. कराड ) येथे निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी शुभारंभ करताना ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे व इतर