नशेची चढतेय झिंग... तरुणाई गुंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:43 PM2019-09-18T23:43:59+5:302019-09-18T23:44:03+5:30
सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : व्यसनाच्या आहारी गेलेले लोक नवनवीन साधनांचा शोध घेऊन त्या माध्यमातून स्वत:ची ...
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : व्यसनाच्या आहारी गेलेले लोक नवनवीन साधनांचा शोध घेऊन त्या माध्यमातून स्वत:ची तल्लफ भागवितात. काही वर्षांपूर्वी तरुणाईकडून व्यसनासाठी व्हाईटनरचा वापर केला जात होता. त्यावर पायंबद घातल्यानंतर आता प्लायवूड चिटकविणाऱ्या डिंकाचा नशेसाठी वापर केला जात आहे. हा नवा अन् जीवघेणा ड्रेंड तरुणाईत रुजू लागला असून, साताºयातील अल्पवयीन व शाळकरी मुले याच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
गांजा, चरस, ब्राऊश शुगर अशा अंमली पदार्थांवर शासनाने बंदी घातली असली तरी बाजारपेठेत सहज उपलब्ध होणाºया व नशेसाठी वापरल्या जाणाºया काही वस्तूंची दखल शासन गांभीर्याने घेत नाही. स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या व्हाईटनर, बूट पॉलिश, नेलपेंट अशा अनेक वस्तूंचा उपयोग आजही नशेसाठी केला जात आहे. या वस्तू बाजारपेठेत सहज व कमी पैशात उपलब्ध होतात. याचे गंभीर परिणाम समोर आल्यानंतर तरुणाई नशेसाठी नव्या साधनांचा शोध घेत आहे. असाच नवा अन् जीवघेणा ट्रेंड आता साताºयातील तरुणांमध्येही रुजू लागला आहे.
प्लायवूड चिकटविण्यासाठी वापरल्या जाणाºया डिंकाचा नशेसाठी सर्रास वापर केला जात असून, शाळकरी व अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी जात आहेत. हा डिंक बाजारपेठेत सहज उपलब्ध होत आहे. याचा पुढे कशासाठी वापर केला जातो, हे दुकानदारांनाही समजत नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही या डिंकाची विक्री केली जाते. श्रीखंडासारखा व चिकट असणारा हा डिंक प्लास्टिक पिशवीत भरून तो हुंगला जातो. त्याच्या तीव्र वासाने तरुण सुन्न होऊन जातात. सुमारे तीन ते चार तास या नशेचा प्रभाव राहतो.
अजिंक्यतारा किल्ला, चार भिंती हा परिसर निर्जन असल्याने तरुणांचे टोळके याठिकाणी समूहाने येऊन नशा करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून तरुणांची ही जीवघेणी नशा सुरूच आहे. या परिसरात डिंकाच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक पिशव्यांचे खच पडले आहेत. शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात असूनही पालकांना या गोष्टीची टिचभर कल्पना नाही. स्वस्तातील ही नशा जीवावर बेतण्यापूर्वी पालकांनी आपला मुलगा काय करतो, तो कोठे जातो, त्याचा मित्र परिवार या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे आता गरजेचे बनले आहे.
स्वस्तातील नशा बेतू शकते जीवावर...
तज्ज्ञांच्या मते वारंवार नशा केल्याने याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. जे तरुण या डिंकापासून नशा करतात ते नेहमी अस्वस्थ असतात. कालांतराने त्यांच्या मेंदूवर मोठा आघात होऊ शकतो. डोळ्यांमध्ये जळजळ वाढते. हळूहळू चिडचिडेपणा वाटतो. लक्ष लागत नाही. नशा करण्यासाठी पैसे मिळविणे आणि यासाठी प्रसंगी चोरी करण्यासाठी ते मागे-पुढे पाहत नाही. व्यसन करणारी मुले घरात बºयाचदा सुन्न बसून असतात. स्वत:तील ही नशा त्यांच्या जीवावरही बेतू शकते.