फुलझाडे नसल्याने दुभाजक ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:01 PM2017-07-22T15:01:47+5:302017-07-22T15:01:47+5:30
वृक्षारोपणाची गरज : पाटण, कार्वे रस्त्यावरील स्थिती
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (जि. सातारा) : कार्वे ते कऱ्हाड चौपदरी रस्त्याच्या दुभाजकात फुलझाडे लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हा दुभाजक मोकळा दिसत असून फुलझाडे अथवा शोभिवंत रोपांची लागवड केल्यास दुभाजकाला चांगले रूप प्राप्त होईल.
कार्वे ते कऱ्हाड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले नाही. त्यामुळे चांगला रस्ता करूनही फुलझाडांविना या रस्त्याची शोभा हरवल्याचे दिसत आहे. या दुभाजकात मातीचा भराव करण्यात आला आहे. सध्या या मातीत तण व इतर रोपटी उगवली असून त्यामुळे रस्ता चांगला असुनही दुर्दशा झाल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे दुभाजकात रोपांची लागवड करावी, अशी मागणी वाहनधारक व वृक्षप्रेमींमधून केली जात आहे.
कऱ्हाड-पाटण मागार्चेही चौपदरीकरण झाले आहे. मध्यंतरी या रस्त्याच्या दुभाजकात फुलझाडे लावण्यात आली. मात्र, निगा न राखल्यामुळे फुलझाडे नष्ट झाली आहेत. सध्या या रस्त्याचा दुभाजकही रिकामा दिसत असून या दोन्ही मार्गाच्या दुभाजकात रोपांची लागवड केल्यास रस्त्याला नवे रूप प्राप्त होईल.