पावसाअभावी भात पिकाचे उत्पन्न घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2015 10:44 PM2015-06-29T22:44:39+5:302015-06-30T00:21:06+5:30

पाटण तालुका : चिखलणीसाठी पाणीसाठाच नाही

Due to the absence of rainfall, the yield of rice crop will decrease | पावसाअभावी भात पिकाचे उत्पन्न घटणार

पावसाअभावी भात पिकाचे उत्पन्न घटणार

googlenewsNext

मल्हारपेठ : ऐन पावसाळ्यातील जून महिना संपला तरी भात रोपांची लागण करण्याइतपत पुरेसा पाऊस पडत नाही. तसेच भात लागणीच्या चिखलणीसाठी पाणीसाठा नसल्याने पाटण तालुक्यातील भात लागणी खोळंबल्या आहेत. यावरून यावर्षाचे भात पिकाचे उत्पन्न घटणार असे दिसू लागले आहे.आजपर्यंतच्या खरीप हंगामास पाटण तालुक्यातील कोयनानगर, पाटण विभाग भातशेतीच्या लागणी आघाडीवर असायच्या; परंतु या वर्षीच्या खरीप हंगामात एक तर उशिरा पावसाला सुरुवात झाली आणि एका आठवड्यातच उघडीप दिली. या दरम्यान इतर विभागात पेरण्या होत आल्या; परंतु भात रोपांची तरवे तयार होऊनही वाफा पद्धतीने चिखल करून भात लागणीस पुरेसा पाऊस व पाणी उपलब्ध नसल्याने लागणीची कामे रखडली आहेत. जुलै महिन्यात पुरेसा पाऊस नाही पडला तर भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.भात पिकासाठी जास्त पावसाची गरज आहे. पाटण तालुक्यात ६७५०९ हेक्टर जमीन क्षेत्र असून, ३८ हजार हेक्टरवर पेरण्या होत आल्या असून, त्यामध्ये भात पेरणी ५४७५ हेक्टरवर झाली व ६८४ वर भात तरू टाकले, ज्वारी पेरणी ७८४७ हेक्टर, मका ४७६, नाचणी १३७, हे. वरी १०५, आंतरपीक तूर ४२४, मूग १५६, उडीद ३१२, पावटा २१० हेक्टर, घेवडा १७०, चवळी १९०, मटकी २६, भुईमूग ८९५७, सोयाबीन ७४०५, कारळा १८८, चारापीक १२२, भाजीपाला १२९, मसाला पीक ६२ हेक्टर व उसाचे क्षेत्र ४९८० हेक्टर अशी २२ जून रोजीपर्यंतच्या पीकपाणी व पेरणीची माहिती उपलब्ध झाली आहे. यंदा एकुण ३८ हजार हेक्टर पिकाची लागवड झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the absence of rainfall, the yield of rice crop will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.