दहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:27 PM2019-01-22T13:27:43+5:302019-01-22T13:29:46+5:30

तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, ता. पाटण) असे मृत मुलीचे नाव आहे.

Due to the death of a Class X student, the accident happened at Guadal | दहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात

दहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात

Next
ठळक मुद्देदहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात चाकाखाली सापडल्याने अपघात

सणबूर (सातारा) : तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, ता. पाटण) असे मृत मुलीचे नाव आहे.

घटनास्थळावरील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमावले येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिरात दहावीच्या वर्गात समृद्धी शिकते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी मैत्रिणींसोबत गावाजवळच्या बसथांब्याजवळ आली होती. त्यावेळी ढेबेवाडीकडून कऱ्हाडकडे निघालेली कऱ्हाड आगाराची (एमएच १४ बीटी ३६६५) बस पकडताना ती बसच्या पुढील चाकाखाली सापडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाइकांनी गर्दी केली. येथील पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

समृद्धी अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. विद्यालयातील विविध उपक्रमांतून तिचा सहभाग असायचा. तिच्या अपघाती निधनाचे वृत समजताच विद्यालयासह गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू आहे.

Web Title: Due to the death of a Class X student, the accident happened at Guadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.