दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:02 PM2019-02-20T23:02:38+5:302019-02-20T23:03:28+5:30

चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर

Due to drought situation in livestock market .. 53 out of the ration and 3 proposals from the molasses | दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

Next

सागर गुजर ।
सातारा : चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर शेतकºयांनी भर दिला आहे. माण तालुक्यातून ५३ तर खटाव तालुक्यातून ३ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असून, या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच दुष्काळी जनतेची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, म्हसवड, कुकुडवाड, आंधळी, शिंगणापूर, मलवडी, गोंदवले बुद्रुक या मंडलांतील ५३ गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात विविध सामाजिक व सहकारी संस्थांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. खटाव तालुक्यातील कातरखटाव व मायणी या दोन मंडलांतील दोन गावांत चारा छावणी सुरू करण्यासाठी ३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

दरम्यान, शासनाने मागील आठवड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चारा छावणी मागणीचे प्रस्ताव शासनाने मागवून घेतले आहेत.

माण तालुक्यातील पांगरी, वडगाव, बिजवडी, जाधववाडी, मोगराळे, येळेवाडी, बिजवडी, बिदाल, बोडके, जाधववाडी, बिरोबानगर पांगरी, तोंडले, भाटकी, माळवाडी, हवालदारवाडी, इंजबाब, संभूखेड, भालवडी, मार्डी, वाकी, हिंगणी, म्हसवड, पळसावडे, दिवड, कुकुडवाड, टाकेवाडी, आंधळी, पांढरवाडी, कासरवाडी, शेनवडी, पानवण, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, राजवडी, बिजवडी, मलवडी, पिंगळी बुद्रुक, पिंपरी, पळशी, गोंदवले खुर्द या गावांमध्ये तसेच खटाव तालुक्यातील एनकूळ, हिवरवाडी या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने तपासणी होणार आहे. हे प्रस्ताव संबंधित तालुक्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. योग्य प्रस्ताव प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहेत.


२८ हजार ३७६ पशुधन बाधित
दुष्काळी तालुक्यातील २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टाने पशुधन जगवित असून, चारा छावण्या कधी सुरू होणार? याकडे दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
 

माण तालुक्यावर नेहमीच पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस झाला असल्याने जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.
- संभाजी कदम, दहिवडी


दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जनावरे घेऊन बाजार गाठू लागले आहेत.

Web Title: Due to drought situation in livestock market .. 53 out of the ration and 3 proposals from the molasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.