नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:47 PM2018-06-01T22:47:45+5:302018-06-01T22:47:45+5:30

Due to the efforts of the employers, the village will be cleaned | नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

googlenewsNext

अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या पावसात हे बंधारे गाळाने नव्हे तर पाण्याने तुडुंब भरणार आहेत.
मूळ चोरे गावचे; पण नोकरी निम्मिताने मुंंबई, पुणे, सातारा, कºहाड अशा अनेक गावात स्थायिक झालेल्या चोरेकरांनी ‘चोरे विकास मंच’ स्थापन केला आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून सलग तीन रविवारी गाळाने भरलेल्या तीन बंधाºयातून सुमारे साडेतीनशे ट्रॉली गाळ उपसला. शेतकºयांच्या शेतीला हा गाळ दिला.
चोरे व परिसरात नेहमीच शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होत असतो. याठिकाणी अनेक बंधारे बांधून पाणी अडवण्याचा व जिरवण्याचा प्रयत्न झाला आहे; परंतु हे बंधारे गाळाने भरून गेले असल्यामुळे डोंगरावरून पावसाचे आलेले पाणी बंधाºयात अडत नाही. ते ओढ्याने खाली येऊन नदीला मिळते. ‘चोरे विकास मंच’च्या वतीने या परिसरातील गाळाने भरलेले तीन बंधारे गाळमुक्त करण्याचा निर्धार केला. दर रविवारी एक बंधारा अशा पद्धतीने सकाळी सात वाजता कामास सुरुवात करण्यात येत होती. मंचचे सदस्य जवान शरद भोसले यांनी स्वत:चा ट्रॅक्टर माती वाहण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर शेतकºयांनीही स्वत:चे सुमारे १० ट्रॅक्टर गाळ वाहतुकीसाठी दिले. विकास मंचच्या वतीने जेसीबी भाडेतत्वावर आणण्यात आला होता. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मंचचे सदस्य संजय गोळे, दिलीप साळुंखे, प्रा. महेश लोखंडे, प्रा. जगन्नाथ देटके, राजकुमार माने, आबासाहेब लोखंडे, अंगद साळुंखे, सचिन भोसले, महेश सकटे, सतीश गोळे ही मंडळी दिवसभर कामाच्या ठिकाणी थांबू लागली. बंधाºयात उगवलेली झुडपे तोडणे, माती नेण्यासाठी नियोजन करणे, वाहने काढण्यास मदत करणे, वाहन चालकांना चहापाणी देऊन त्यांचा उत्साह वाढविणे हे काम हे करीत होते.
या उपक्रमात ज्यांना सहभागी होता येत नव्हते, अशा दत्तात्रय यादव, सुभाष गोळे, प्रा. अरविंद गोळे, रवी कवळे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, जवान विजय साळुंखे, निखिल साळुंखे, संतोष गोळे, माऊली साळुंखे, जवान सचिन साळुंखे, अनिल लोखंडे यांनी आर्थिक पाठबळ दिले. हा उपक्रम सलग तीन रविवारी यशस्वी राबवला गेला. हे तीन बंधारे गाळमुक्त करण्यासाठी सावरघरचे सुहास पाटील, रामदास बाबर, भांबेचे संदीप पाटील, अप्पासाहेब साळुंखे यांनी गाळ स्वत:च्या वाहनाने नेऊन या उपक्रमास सहकार्य केले.
चांगल्या विचारांचे युवक एकत्र आल्यावर काहीही शक्य होते, हे या निमित्ताने या मंचच्या युवकांनी दाखवून दिले आहे.
तीन बंधाºयांत चाळीस लाख लिटर पाणी साचणार
गाळ काढल्यामुळे आता या तीन बंधाºयांत सुमारे चाळीस लाख लिटर पाणी साठवण होईल, असा अंदाज शासकीय अधिकाºयांनी वर्तवला आहे. या बांधºयात साठणाºया पाण्यावर सुमारे तीस एकर शेतीक्षेत्र भिजणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाणी पाझराच्या माध्यमातून खालच्या भागातील विहिरीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Due to the efforts of the employers, the village will be cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.