डाळींबावर मर अन तेल्या रोगाच्या प्रादुभार्वाने

By admin | Published: July 17, 2017 02:53 PM2017-07-17T14:53:39+5:302017-07-17T14:53:39+5:30

अनुदानाची मागणी : झाडे जळून गेल्याने लाखोंचे नुकसान

Due to the emergence of pomegranate and pomegranate disease | डाळींबावर मर अन तेल्या रोगाच्या प्रादुभार्वाने

डाळींबावर मर अन तेल्या रोगाच्या प्रादुभार्वाने

Next



आॅनलाईन लोकमत

वाठार निंबाळकर(जि. सातारा), दि. १६ : मर अन तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फलटण तालुक्यातील अनेक गावांमधील डाळींबाच्या बागा जळून चालल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

डाळींबाचे भरघोस उत्पादन व उच्चांदी दर मिळत असल्याने तालुक्यातील निरगुडी, धुमाळवाडी, गिरवी, ताथवडा, उपळवे, जाधवनगर, दालवडी, वाठार निंबाळकर, वाखरी, धुळदेव, सोनवडी, सासकल, दुधेबावी, वडले, नाईकबोमवाडी, जावली, आंदरुढ, कुरवली, राजुरी, वेळोशी, सावंतवाडा, तावडी, ठाकुरकी, विडणी आदींसह इतर गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून मोठ्या रकमेची पिककर्ज घेऊन लागवड केली.

लागवड करताना खड्डे खोदणे, रोपे खरेदी, लागवडीवेळी रासायनिक व सेंद्रीय खरे, मजुरी आदींचा खर्च मोठा असतो. लागवडीनंतर वारंवार औषधे फवारणी, झाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी फवारणी तसेच इतर अन्नद्रव पुरवणे यामध्ये खुरपण व इतर मजुरी आदींचा खर्च डाळींबाला फळ येईपर्यंत लाखो रुपये खर्च होतात. त्यातही फळ आल्यावर फळांना उन, वारा, पावसाचा परिणाम होऊन नये यासाठी खर्च करावे लागतो.

श्रम अन् पैसा खर्च करुनही डाळींबांना सध्या पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. या दरामध्ये डाळींबाची विक्री झाल्यास शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे दोन वर्षांचे कष्ट व बँकेचे व्याज व कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

फलटण तालुक्यातील सर्वच गावांमधील डाळींबाच्या बागांवर तेल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.


उदारीवर खते व औषधे आणली. तसेच मजुरांच्या मजुरीसाठी उसनवारी पैसा आणून खर्च केला. पंधरा ते चाळीस रुपये किलो दराने डाळींब विकल्यास दुसऱ्यांचे पैसे कसे द्यायचे हाही प्रश्नच आहे.
- सचिन जगताप
शेतकरी उपळवे


तीन एकर बाग खाक
धुळदेव येथील शेतकरी शुभम ननावरे यांनी तीन वर्षांपासून लाखो रुपये खर्च करुन डाळींब पिकाचे उत्पादन घेतले. मात्र, तेल्या व मर रोगामुळे तीन एकरातील बाग जळून खाक झाली आहे.

Web Title: Due to the emergence of pomegranate and pomegranate disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.