गोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:09 AM2019-04-24T11:09:08+5:302019-04-24T11:10:13+5:30

फलटण येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले.

Due to the extinguishing of the godown fire, millions of rupees have been saved | गोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले

गोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले

Next
ठळक मुद्देगोदामाची आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचलेशॉर्टसर्किटने आग : टेबल, खुर्ची, फॅन जळून खाक

फलटण : येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान्य वाचले.

शासकीय धान्य गोदामास सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हा प्रकार उपस्थित लोकांच्या लक्षात आला. गोदामाची चावी नसल्याने शटरचे कुलूप तोडण्यात आले. तोपर्यंत पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचे फवारे मारून काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली.

त्यामुळे या जुन्या शासकीय गोदामात २३२२.५० क्विंटल गहू, २४४९ क्विंटल तांदूळ, ७० क्विंटल साखर, २१३.५० क्विंटल तूरडाळ, १३० क्विंटल चणाडाळ अशा प्रकारचा लाखो रुपयांचा साठा सुरक्षित राहिला. मात्र, या आगीत हमाल बिल रजिस्टर, २ टेबल, ४ खुर्ची, २ पंखे जळून खाक झाले.

एकाच मीटरवर लोड..

मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामास शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामातील मीटरमधून वीज कनेक्शन घेण्यात आले होते. कुलर, फॅन, ट्यूबचा लोड एकाच मीटरवर आल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याची शक्यता गोदामाची पाहणी केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Due to the extinguishing of the godown fire, millions of rupees have been saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.