दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद, अतिपावसामुळे कोसळली दरड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:52 AM2019-08-03T10:52:22+5:302019-08-03T10:52:29+5:30

केळघर महाबळेश्वर मार्गावरील रेंगडी काळ्या कड्यानजीक गावानजीक घाटात दरड कोसळून रस्त्यात आल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली.

Due to heavy downpour, traffic on Mahabaleshwar closed | दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद, अतिपावसामुळे कोसळली दरड

दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद, अतिपावसामुळे कोसळली दरड

Next

सायगाव :जावळी तालुक्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केळघर महाबळेश्वर मार्गावरील रेंगडी काळ्या कड्यानजीक गावानजीक घाटात दरड कोसळून रस्त्यात आल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. महाबळेश्वर कडे सुट्टी निमित्त वर्षा सहलीवर जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, जावळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सकाळी ही दरड हटवण्याच्या कामास सुरुवात केली. दुपारपर्यंत दरड हटवली जाणार असून, रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

Web Title: Due to heavy downpour, traffic on Mahabaleshwar closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.