काळोशी येथे हाय व्होल्टेजमुळे ३५ घरांमधील टी. व्ही. जळले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:34+5:302021-07-12T04:24:34+5:30

सातारा : तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे अनेक घरांना हाय व्होल्टेजचा झटका बसला. यामुळे ३० ते ३५ घरांमधील टी. ...

Due to high voltage in Kaloshi, T. in 35 houses. V. Burned. | काळोशी येथे हाय व्होल्टेजमुळे ३५ घरांमधील टी. व्ही. जळले.

काळोशी येथे हाय व्होल्टेजमुळे ३५ घरांमधील टी. व्ही. जळले.

googlenewsNext

सातारा : तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे अनेक घरांना हाय व्होल्टेजचा झटका बसला. यामुळे ३० ते ३५ घरांमधील टी. व्ही. जळले तर कोणाचा मीटर जळला आहे. शनिवारी सायंकाळी अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे काळोशीत घबराट निर्माण झाली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथे स्थानिकांची गर्दी झाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याची तक्रार महावितरणकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोना महामारी सुरु असतानाच त्यात आर्थिक फटका बसल्यामुळे लोक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महावितरणने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आम्ही महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

Web Title: Due to high voltage in Kaloshi, T. in 35 houses. V. Burned.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.