तब्बल आठ हजार हेक्टरवर बिबट्याची झेप-कऱ्हाडला बिबट्याप्रवण : अडीचशे पाळीव जनावरांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:11 PM2018-10-25T23:11:53+5:302018-10-25T23:13:49+5:30

‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढंच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. वन विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यातील

Due to leakage of 8,000 hectares, leopard catapulted: Half of three pet animals | तब्बल आठ हजार हेक्टरवर बिबट्याची झेप-कऱ्हाडला बिबट्याप्रवण : अडीचशे पाळीव जनावरांची शिकार

तब्बल आठ हजार हेक्टरवर बिबट्याची झेप-कऱ्हाडला बिबट्याप्रवण : अडीचशे पाळीव जनावरांची शिकार

Next
ठळक मुद्देवराडे, मलकापूर, कोळे परिमंडलात डरकाळी

संजय पाटील ।
कऱ्हाड : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढंच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. वन विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यातील तब्बल आठ हजार हेक्टर क्षेत्रावर आत्तापर्यंत बिबट्या ‘स्पॉट’ झालाय. गत पाच वर्षांत त्याने अडीचशे पाळीव जनावरांची शिकारही केलीय.

कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. अनेक ठिकाणी त्याने पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तालुक्यात पाठरवाडी, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, चचेगाव, विंग, आणे, येणके या भागातच बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जायचे. मात्र, कालांतराने या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला. त्याने मानवी वस्तीत घुसून अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. सध्या बिबट्यांचा वावर एवढा वाढलाय की, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. वनविभागानेही तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट केले आहे. वनाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो रात्रीत सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो. त्यानुसार तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रात बिबट्या वावरल्याचे वन विभाग सांगतो.

उपाशी बिबट्यांचा धोका जास्त
गारवडे, विंग येथे आढळून आलेले बिबटे उपाशी होते, अशी माहिती समोर आली आहे. वनविभागाने बिबट्यांची देखरेख करण्यास गांभीर्याने विचार केला नाही, तर भविष्यात बिबट्याकडून माणसांवर हल्लाची शक्यता नाकरता येत नसल्याचे प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.

कऱ्हाड वन विभागाचे क्षेत्र
राखीव क्षेत्र :

१२,५८५.५७ हेक्टर
अवर्गित क्षेत्र :
१४.६५ हेक्टर
संपादित क्षेत्र :
५५३.६७ हेक्टर
संरक्षित क्षेत्र :
०.० हेक्टर
एकूण क्षेत्र :
१३,१५३.७९ हेक्टर

बिबट्याने केलेली शिकार
२०१३-१४ : २०
२०१४-१५ : १६
२०१५-१६ : ३४
२०१६-१७ : ४४
२०१७-१८ : ७९
२०१८-१९ : ४४


बिबट्या हा मानवी वस्तीलगत वावरणारा वन्यप्राणी आहे. खाद्याच्या शोधात तो मानवी वस्तीत येऊ शकतो. . मुद्दामहून डिवचल्यास तो प्रतिकारात्मक हल्ला करू शकतो. बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
-डॉ. अजित साजणे, परिक्षेत्र वन अधिकारी

Web Title: Due to leakage of 8,000 hectares, leopard catapulted: Half of three pet animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.