‘लोकमत’ च्या वृत्तामुळे दिव्यांग विद्यार्थीनींचे विद्यावेतन बँक खात्यांत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:05 PM2017-08-10T14:05:32+5:302017-08-10T14:15:19+5:30
सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.
सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.
‘लोकमत’ ने बुधवार, दि. ९ आॅगस्टच्या अंकात ‘दिव्यांगांचे विद्यावेतन रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. दिव्यांग विद्यार्थीनींना दिले जाणारे विद्यावेतन रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पालकांच्या येणाºया प्रतिक्रिया लक्षात घेऊन ‘लोकमत’ ने या विद्यार्थींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याला तत्काळ यश आले.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामार्फत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) विद्यार्थीनींना दरमहा २00 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो. दिव्यांग विद्यार्थीनी शालाबाह्य होऊन त्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, हा या प्रोत्साहन भत्त्यामागचा हेतू आहे. संबंधित विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर तो जमा केला जातो.
सन २0१६-१७ या आर्थिक वर्षातील हा प्रोत्साहन भत्ता (विद्यावेतन) मिळाले नव्हते. दिव्यांगांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत शासनही दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार पुढे येत असताना त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्यही वेळेत दिले जात नसल्याने दिव्यांग विद्यार्थीनींचे पालक अस्वस्थ झाले होते.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माध्यमिक विभागातील संबंधित वरिष्ठ सहायकाला नोटीस काढले. तसेच विद्यावेतन का रखडवले आहे?, याची विचारणा केली. त्यावर ३१ मार्च रोजी बँकेकडे याद्या दिल्या होत्या. मात्र, बँकेने वेगवेगळ्या पध्दतीने याद्यांची मागणी केली, त्यामुळे हे विद्यावेतन रखडल्याचे सांगितले. तरीही एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत बँकेने मागितलेल्या पध्दतीनुसार माहिती का दिली गेली नाही?, अशी शंका काढून महत्त्वाच्या कारण नसल्याचे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मार्च २0१६ ते मार्च २0१७ या कालावधीत बारा महिन्यांपैकी दहा महिन्यांसाठी दिले जाणारे ८ लाख २६ हजार रुपयांचे एकूण विद्यावेतन रखडलेले होते. जिल्हा परिषदेने बुधवारीच हा चेक बँकेकडे वर्ग केला आहे. ४१३ विद्यार्थीनींच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे जमा झाले आहेत.
- डॉ. राजेश देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद