नगरसेवकांमुळेच दोन्ही ‘राजें’त वितुष्ट : बाळू खंदारे यांचा आरोप -सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:39 AM2018-12-01T00:39:16+5:302018-12-01T00:40:50+5:30

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राचं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचं नेतृत्व करावं, ही तमाम सातारकरांची इच्छा आहे. मात्र, नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळेच ‘दोन्ही’ राजेंचे मनोमिलन तुटल्याचा खळबळजनक आरोप

Due to municipalities, both the states are divided: Balul Khandare's allegation - General Assembly | नगरसेवकांमुळेच दोन्ही ‘राजें’त वितुष्ट : बाळू खंदारे यांचा आरोप -सर्वसाधारण सभा

नगरसेवकांमुळेच दोन्ही ‘राजें’त वितुष्ट : बाळू खंदारे यांचा आरोप -सर्वसाधारण सभा

Next
ठळक मुद्देमनोमिलनासाठी सत्ताधाऱ्यांचेही प्रयत्न; विकासकामांना बगल, राजकीय चर्चेला बहर

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राचं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचं नेतृत्व करावं, ही तमाम सातारकरांची इच्छा आहे. मात्र, नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळेच ‘दोन्ही’ राजेंचे मनोमिलन तुटल्याचा खळबळजनक आरोप ‘नविआ’चे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी केला. दरम्यान, नगरसेवक निशांत पाटील यांनीही दोन्ही राजे एकत्र यावे, ही सर्वांची इच्छा असल्याचे मत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केले. लेखापरीक्षणातील त्रुटींवर झालेल्या गदारोळानंतर अजेंड्यावरील आठ पैकी सहा विषय सभेत मंजूर करण्यात आले.

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक वसंत लेवे, अशोक मोने, अमोल मोहिते, विजय काटवटे, धनंजय जांभळे यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

मागील सभेचे इतिवृत्त सभागृहापुढे मांडण्यात आल्यानंतर सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवर विषयांचे वाचन करण्यापूर्वीच मोक्कातून जामिनावर असलेले नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी सभागृहापुढे अनेक विषय मांडले. ते म्हणाले, ‘दलित वस्ती विकास योजनेंतर्गत मागासवर्गीयांसाठी निधी दिला जातो. या निधीतून जी कामे अपेक्षित आहेत ती न होता हा निधी इतर ठिकाणच्या रस्त्यांसाठी खर्च केला जात आहे. ही बाब चुकीची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या सफाई कर्मचाºयांची २० ते २५ पदे रिक्त आहेत.मुख्याधिकारी शंकर गोरे व अधिकाºयांनी वारसा नियुक्ती प्रक्रिया रखडवली आहे,’ असाही आरोप यांनी केला.

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोघे भाऊ नगरसेवकांमुळेच वेगळे झाले. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं, ही सातारकरांची इच्छा आहे, असे सांगून खंदारे यांनी सोबत आणलेला रुमाल तोंडाला बांधून ‘महाराज १ व्हा’ अशी आर्त हाक दिली. सभेत हा रुमाल लक्षवेधी ठरला. यानंतर नगरसेवक निशांत पाटील यांनी बाळू खंदारे यांच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘दोन्ही राजे एकत्र यावे, ही सर्वांची इच्छा आहे. वेळ येईल त्यावेळी सर्वच गोष्टी जुळून येतील. मागासवर्गीयांचा निधी प्रशासनाने मंजूर केलेल्या रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता. याचा चुकीच्या पद्धतीने विनियोग केला जात नाही.

नगरसेवक वसंत लेवे यांनी मंगळवार पेठेतील वाचनालयाचा मुद्दा उपस्थित केला. येथील वाचनालयाची इमारत २०११ रोजी बांधण्यात आली. २०१६ पर्यंत ही इमारत तशीच पडून होती. सुमारे १५ लाख रुपये खर्च या इमारतीसाठी करण्यात आला आहे. वाचनालयासाठी आठ लाख रुपयांची पुस्तके खरेदी करण्यात आली. ही पुस्तके आजपर्यंत ना प्रशासनाला पाहावयास मिळाली ना वाचकांना वाचायला. हे ग्रंथालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी लेवे यांनी केली. विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांनीही या मागणीला दुजोरा दिला.

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे काम कधी पूर्ण होणार, प्रशासन खराब रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे की नाही, असे प्रश्न मोने यांनी उपस्थित केले. यावर अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी पालिका व बांधकाम विभागाची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

यानंतर नगरसेवक विजय काटवटे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत वाटप करण्यात आलेल्या बिलांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी अद्याप कोणत्याच कामाची बिले अदा केली नसल्याची स्पष्टोक्ती मागील सभेत दिली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामांची बिले अदा करण्यात आली आहे. खोटं बोला; पण रेटून बोला, असे काम अधिकाºयांकडून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.’

लेखापरीक्षणातील त्रुटीवरून झालेल्या गदारोळानंतर सभेत आठ पैकी सहा विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. सदर बझार येथे पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या विषयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. या विषयासाठी मतदान घेण्यात आले. अखेर १९ विरुद्ध १६ अशा मतांनी सत्ताधाºयांनी हा विषय मंजूर केला. सोनगाव डेपोत ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब बसविण्याचा विषय अपुºया कागदपत्रांमुळे तहकूब करण्यात आला. करंजे येथे प्राथमिक शाळा उभारणे व खेळाचे मैदान तयार करणे, पालिका कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा उतरविणे, पालिकेची मालकी असलेल्या इमारतीमधील मुदत संपलेले गाळे ताब्यात घेणे, केसरकर पेठेतील घरकुलांना नवीन वीज कनेक्शन देणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.

... तर सातारा महापालिका होऊ शकते
सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शाहूपुरी, महादरे, दरे बुद्र्रुक, शाहूनगरचा त्रिशंकू भाग, विलासपूर व खेड ग्रामपंचायतीचा काही परिसर असा सर्व भाग शहराशी जोडला जाणार आहे. सध्याच्या घडीला शहरालगतची ही सर्वच गावे शहरातील रस्ते, पथदिवे, शाळा, मंडई यांचा वापर करतात. किंबहुना या गावांतील लोकांचा रोजचा संपर्क शहराशी येतो.

दोन्ही आघाडींचा हद्दवाढीला विरोध नसताना काही लोकांच्या विरोधाला महत्त्व देऊन ही हद्दवाढ अद्याप अस्तित्वात आणली गेली नाही. या सर्व गोष्टी जुळून आल्या असत्या तर सातारा पालिकेला केव्हाच महापालिकेचा दर्जा मिळाला असता,’ असे मत यावेळी अ‍ॅड. दत्ता बनकर व अशोक मोने यांनी व्यक्त केले.

आरक्षण हटवा मग इमारत बांधा
सदर बझार येथे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादंग पेटले. आमचा इमारतीला विरोध नाही. मात्र, ज्या जागेवर आरक्षण असेल अशा जागेवर प्रशासकीय इमारत कशी बांधता येईल, असा प्रश्न अशोक मोने यांनी उपस्थित केला. आरक्षण उठल्यानंतर हा प्रस्ताव चर्चेस घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, सत्ताधारी मतावर ठाम होते. अखेर या विषयासाठी मतदान घेण्यात आले. १९ विरुद्ध १६ अशा मतांनी सत्ताधाºयांनी हा विषय मंजूर केला.

१४५ गाळे पालिकेच्या ताब्यात !
पालिकेची मालकी असलेल्या इमारतींमधील तब्बल १४५ गाळ्यांची मुदत संपली आहे. यापैकी काही गाळ्यांची मुदत गेल्यावर्षी संपूनसुद्धा हे गाळे अद्याप सुरूच आहे. पालिकेच्या मालमत्तेला कोणीच वाली नाही का, या गाळ्यांचे भाडे निश्चिती न करता पालिकेने सर्व गाळे ताब्यात घ्यावेत, अशी एकमुखी मागणी विरोधकांनी केली. या विषयावर सभेत एकमत झाल्याने पालिकेच्या मालकीचे १४५ गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.

मुख्याधिकाºयांविरोधात तक्रारींचा ओघ
मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांकडे आतापर्यंत ३० तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी मुख्याधिकाºयांची चौकशी केली जाणार आहे, असे सांगून बाळू खंदारे म्हणाले, ‘दोन्ही आघाडींच्या नगरसेवकांना घाबरूनच मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पालिकेच्या सभेला दांडी मारली आहे.

लेखापरीक्षणात ७७३ त्रुटी
पालिकेच्या लेखापरीक्षणात ७७३ त्रुटी असून, गेल्यावर्षीपेक्षा यामध्ये ९० त्रुटींची भर पडली आहे. एवढ्या त्रुटी असूनही पालिका प्रशासन सुस्त बसून आहे. याचा खुलासा प्रशासनाने केलेला नाही. दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासनाने नेमकी काय कामे केली, इतक्या त्रुटी आढळूनही कोणावर कारवाई का झाली नाही? असा सवाल विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


सातारा पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवेंद्रसिंहराजे यांच्या आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी ‘महाराज १ व्हा’ असे वाक्य लिहिलेला रुमाल तोंडाला बांधला होता. दोन्ही राजेंना जर एकत्र आणायचे असेल तर मी शांत बसतो, तुम्हीही मतभेद बाजूला ठेवून शांत बसा, असा सूचक संदेश त्यांनी दिला.


स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या बिलांच्या मुद्द्यावरून भाजप नगरेवक विजय काटवटे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. दत्तात्रय बनकर यांच्यात तू-तू मैं-मैं झाली.

Web Title: Due to municipalities, both the states are divided: Balul Khandare's allegation - General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.