बांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड, रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:46 PM2019-03-18T15:46:14+5:302019-03-18T15:47:36+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे.

Due to neglect of construction, road blockade of Kumbad, Rahimatpur-Satara road | बांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड, रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

बांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड, रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाडवाहनधारकांची कसरत : रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

रहिमतपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रहिमतपूर-सायगाव दरम्यानच्या रस्त्यावर डांबर, खडी, माती गोळा होऊन रस्त्यावरच टेमकी उभी राहिली आहे. एकप्रकारे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड आले आहे. अशा रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

रहिमतपूर-सातारा रस्त्यावरून दररोज विविध प्रकारच्या हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. गेल्या अनेक वर्षांपासून रहिमतपूर ते सातारा या २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण केलेले नाही. राज्यात व केंद्रात कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी प्रत्येकवेळी जागोजागी एक-दोन किलोमीटर अंतराच्या तुकडीकरणात खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.

एक-दोन वर्षांआड तुकडीकरणात होणाऱ्या डांबरीकरणामुळे अगोदर झालेल्या डांबरी रस्त्याची वाट लागलेली असते. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाच्या कामकाजामुळे नवा कोरा रस्ता दोन पावसाळेही व्यवस्थित काढत नाही. एका पावसातच खड्ड्यांतील व रस्त्याची खडी बाहेर निघते. सध्या या रस्त्याची विदारक अवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे तेही फुटाफुटाचे पडले आहेत.

Web Title: Due to neglect of construction, road blockade of Kumbad, Rahimatpur-Satara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.