राखी पाैर्णिमेमुळे जिल्ह्यातून एसटीने वाढविल्या १२९ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:46+5:302021-08-20T04:45:46+5:30
सातारा : बहीण-भावाच्या पवित्र नात्यांचा सण रक्षाबंधन चार दिवसांवर आला आहे. कोरोनानंतर आता कोठे परिस्थिती सुधारत असल्याने या सणानिमित्ताने ...
सातारा : बहीण-भावाच्या पवित्र नात्यांचा सण रक्षाबंधन चार दिवसांवर आला आहे. कोरोनानंतर आता कोठे परिस्थिती सुधारत असल्याने या सणानिमित्ताने बहीण-भावाला भेटता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, रविवार व सोमवारसाठी १२९ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
सातारा विभागातील अकराही विभागांतून विविध मार्गांवर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे रक्षाबंधनसाठी वेळेवर पोहोचणे, तसेच परत येणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे सातारकरांना चांगलीच सोय होणार आहे.
सातारा आगारातून फेऱ्या
nसातारा-पुणे १०
nसातारा-मुंबई ३
nसातारा-सायन २
nसातारा-ठाणे-बोरिवली - २
कऱ्हाड आगारातून फेऱ्या
nकऱ्हाड-पुणे ६
nकऱ्हाड-सोलापूर २
nकऱ्हाड-मुंबई ३
चौकट
प्रवाशांची गर्दी
nयंदाचा रक्षाबंधन सण हा रविवारी आला आहे, तसेच शासकीय कार्यालयांना शनिवारी सुटी असते. त्यामुळे जोडून सुट्या आल्याने या दिवशी बहीण भावाकडे किंवा भाऊ बहिणीच्या गावी जाणार असल्याने सर्वच बसस्थानकात गर्दी होऊ शकते.
nगेल्यावर्षी कोरोनामुळे एसटी बंद होत्या. आता सुरू असल्याने साताऱ्यातून परजिल्ह्यात जास्तीत जास्त गाड्या सोडल्या आहेत.
कोट
सातारा आगारातून शनिवार, रविवारी, सोमवार, मंगळवारी विविध मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे इतर विभागाच्या गाड्याही याच बसस्थानकातून जाणार आहेत.
- रेश्मा गाडेकर,
आगार व्यवस्थापक, सातारा.
फोटो
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवासी वाढत आहेत. (छाया : जावेद खान)