सिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:49 PM2018-09-24T13:49:14+5:302018-09-24T13:54:28+5:30
कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.
सातारा : कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात आले. सध्या पावसाने उघडीप दिली असलीतरी धरणात पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरणही यावर्षी गतवर्षीपेक्षा लवकर भरले. १०४ टीएमसीच्यावर धरणातील पाणीसाठा गेला होता.
सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. २१ सप्टेंबरला धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा होता. तो सोमवारी सकाळपर्यंत १००.३८ टीएमसीवर आला.
सध्या धरण परिसरात पाऊस नसल्याने आवक कमी झाली आहे. कोयना धरण परिसरात यावर्षी आतापर्यंत ५२९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे एकूण ५९१२ आणि महाबळेश्वर येथे ५०९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.