सातारा : मुळीकवाडीत भीषण पाणी टंचाई, तलाव, विहिरी कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 02:44 PM2018-12-19T14:44:04+5:302018-12-19T14:50:06+5:30
खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मायणी : खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मुळीकवाडी हे अकराशे लोकसंख्येचे गाव. सुमारे अडीचशे ते तीनशे घरे. या ठिकाणी असणाºया मुळीकदारा व कटकळीचा (विखळे तलाव) तलाव येथून व तलावाजवळ असलेल्या विहिरीतून पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत होते.
उसाचे वाडे चार-पाच रुपयांना पेंडी..
येथील ग्रामस्थ पिण्यासाठी एक टँकर पाणी एक हजार ते अकराशे रुपयाला खरेदी करत असून, जनावरांसाठी उसाचे वाडे चार ते पाच रुपयांना घेत आहेत तर शेजारच्या गावामध्ये असणाऱ्यां शेतकऱ्यांकडून सुमारे तीन हजार रुपयांना गुंठा याप्रमाणे ऊसकिंवा इतर चारा घेत आहेत.