उंब्रजमध्ये वीज पडून दोन फूट खड्डा; पाहण्यासाठी लोकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 09:40 PM2022-06-08T21:40:56+5:302022-06-08T21:41:07+5:30
या खड्यात ही अंतर्गत दोन होल पडले असून ते होल खोलवर असून किती फूट आत गेले आहेत हे समजू शकलेले नाही
उंब्रज:-येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या आवारात आज सायंकाळी ६वाजण्याच्या सुमारास कडकडाट करत वीज पडली.या विजेमुळे जमिनीत सुमारे दोन फूट व्यासाचा खड्डा पडला.
आज सायंकाळी उंब्रज व परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची आवारात मोठा कडकडाट करत वीज पडली. यामुळे तेथे खड्डा निर्माण झाला.दरम्यान, या खड्यात ही अंतर्गत दोन होल पडले असून ते होल खोलवर असून किती फूट आत गेले आहेत हे समजू शकलेले नाही.वीज पडल्यानंतर घटनास्थळी मोठया प्रमाणात धूर निर्माण झाला.सुमारे दोन तासानंतर संबंधित खड्यातुन धूर येत होता.तसेच खड्यातील माती कोळस्या सारखी काळी पडली होती.या घटनेनंतर सर्वत्र या घटनेची चर्चा होऊन ही घटना पाहण्यासाठी लोक घटनास्थळी येत होते
पाऊस पडू लागल्यानंतर आम्ही शेती उत्पन्न बाजार समितीच्या आतील रस्त्यावर सुरक्षित थांबलो होतो.अचानक मोठा आवाज होऊन वीज शेती उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या आवारात पडली.धुराचा लोट निर्माण झाला - मुराद मुल्ला (रिक्षा व्यावसायिक)