औंधासुराच्या वचनामुळे नगरीस नाव औंध
By admin | Published: April 1, 2015 09:55 PM2015-04-01T21:55:54+5:302015-04-02T00:48:39+5:30
मूळपीठ म्हणून उदयास : श्री यमाईदेवीने औंधासुराचा वध केला त्या ठिकाणी उभारले स्मारक --नावामागची कहाणी-चोेवीस
रशिद शेख - औंध -आपले खडग औंधासुरावर सोडले व त्याचे शीर धडा वेगळे केले. अंतसमयी औंधासुराने श्री यमाईदेवीस वचन मागितले की, या नगरीस माझे नाव देण्यात यावे. त्यावेळी पासून या नगरीस औंध नाव पडले. श्री यमाईने औंधासुराचा जेथे वध केला. त्या ठिकाणी त्याला स्थान दिले असून, त्याचे स्मारक आहे. हे ठिकाण गावाच्या मध्यभागी आहे. येथेच श्री यमाईदेवीचे सुंदर असे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, समोर औंधासुराची मूर्ती आहे. औंध गावाच्या नैऋत्यास असलेल्या १५०० फू ट उंचीच्या टेकडीवर श्री यमाईदेवीचे स्थान आहे. या शक्तिपीठास मूळपीठ असे म्हणतात. हे देवस्थान जागृत स्वयंभू व पवित्र आहे. अतिप्राचीन व भव्य ऐतिहासिक दगडी, कोरीव दुर्मिळ कलाकृतीचे दर्शन म्हणजे श्री यमाईदेवीचे मंदिर इ. स. १७४५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तटाचा जीर्णाेद्धार केल्याचा शिलालेख आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काळ्या पाषाणातील ४३२ पायऱ्या आहेत. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु औंधच्या राजाने एक दशक आधीच जनतेला स्वातंत्र्य दिले होते. श्रीमंत भगवानराव ऊर्फ बाळासाहेब महाराज नेहमी म्हणत औंध नेहमी अग्रेसर असावे, औंधचा आदर्श इतरांनी घ्यावा.