दुर्गम शाळांचा ‘आयएसओ’मध्ये डंका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 10:49 PM2017-08-06T22:49:04+5:302017-08-06T22:49:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : तालुक्यात संथगतीने का होईना प्राथमिक शिक्षणाचा प्रचार सुरू झाला आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी कात टाकली आहे. तालुक्यातील शाळा डिजिटल तसेच आयएसओ होत आहेत. सध्या तालुक्यातील ६१ शाळा आयएसओ झाल्या असून, या शाळेत एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, लॅपटॉप, टॅबसह अनेक आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरºयांतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.
पाटण तालुक्यात एकूण ३२५ महसुली गावे आहेत. या महसुली गावांत आणि वाडी-वस्तीमध्ये एकूण ५३२ शाळा आहेत. त्यामध्ये तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या एकूण ३८६ शाळा आहेत. तर पहिली ते सातवीच्या १४६ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गटशिक्षणाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली ६ विस्तार अधिकारी, २२ केंद्र प्रमुख, ६ वरिष्ठ मुख्याध्यापक, २९५ पदवीधर शिक्षक आणि ९७४ उपशिक्षक ग्रामीण आणि डोंगरदºयांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. तालुक्यात एक शिक्षकी एकही शाळा राहिलेली नाही. हे काम करताना त्यांना स्थानिक अडचणीदेखील येतात. या अडचणीवर शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाकडून मार्ग काढून तालुक्यातील शिक्षणाची गंगा वाडी-वस्तीवर पोहोचविण्याचे काम सुरू आहे. तालुका डोंगराळ असला तरी या डोंगरातील विद्यार्थी ज्ञानार्जनामध्ये कमी पडू नये. तसेच नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञानही तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्याचे काम पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून होत आहे.
शिक्षणाची गंगोत्री तालुक्यातील खेडेगावातही पोहोचली आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर शिक्षण पोहोचले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि नेतेमंडळी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षणासाठी मदत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, इंटरनेट यासारखे आधुनिक तंत्रज्ञान शाळांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी सुमारे २५ लाख रुपये लोकसहभागातून मिळाले आहेत. यावरून तालुक्यातील ग्रामस्थ शिक्षणाबाबत किती जागरुक आहेत, हे दिसून येते.
तालुक्यात शाळेच्या इमारती चांगल्या प्रकारच्या असून, शाळेला कंपाऊंड, प्रवेशद्वार त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. याबरोबरच शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे ओळखपत्र देण्यात आली आहेत. व्याघ्रप्रकल्प बाधित असणाºया शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या माध्यमातून जगाची ओळख करून देत आहेत. तर गावडेवाडी या डोंगराळ शाळेत मुलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेच्या भिंतीवर गणिताची सूत्रे, इंग्रजी शब्दचित्र स्वरुपात तसेच थोर व्यक्तींचे महात्म्य सांगणारे लेख, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचे मंत्रिमंडळ यांची माहिती रेखाटण्यात आली आहेत. तालुक्यात ५३२ शाळा या प्रगत आहेत.
तालुक्यातील उल्लेखनीय शाळा...
पाटण तालुक्यात डोंगरामध्ये असणाºया गावढेवाडी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे शाळेच्या पटांगणातील हालचाली तसेच वर्गातील शिक्षकांचे ज्ञानदानही चित्रीत केले जाते. तारळे विभागातील भैरेवाडी येथील प्राथमिक शाळेत सर्वच विद्यार्थ्यांना टॅबद्वारे शिक्षण देण्यात येते. तर पाथरपुंजसारख्या दुर्गम शाळेत लॅपटॉपवर संगीत, पाढे शिकविण्यात येतात. चित्रफितीद्वारे हसत खेळत शिक्षण दिले जाते.
शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त
पाटण तालुक्यात शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. असे असताना तालुक्याच्या शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी ३, केंद्रप्रमुख २१, पदवीधर शिक्षक ५७, उपशिक्षकांची १७२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरल्यास शिक्षण क्षेत्रात आणखी प्रगती होऊ शकते.