दिवाळीच्या हंगामात पाचगणीतील टेबल लँन्ड पर्यटकांनी गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 07:56 PM2022-10-25T19:56:50+5:302022-10-25T19:57:19+5:30

Panchgani Tourism: दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर  दिवाळी सुट्टी लक्ष्मी पूजन झाल्याने पर्यटकांची पाऊले पर्यटन स्थानाकडे वळली असून आज टेबल लँन्ड वर घोडेसवारी मुक्त फिरत निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला

During the Diwali season, the table land in Panchgani is crowded with tourists | दिवाळीच्या हंगामात पाचगणीतील टेबल लँन्ड पर्यटकांनी गजबजले

दिवाळीच्या हंगामात पाचगणीतील टेबल लँन्ड पर्यटकांनी गजबजले

googlenewsNext

पाचगणी - दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर  दिवाळी सुट्टी लक्ष्मी पूजन झाल्याने पर्यटकांची पाऊले पर्यटन स्थानाकडे वळली असून आज टेबल लँन्ड वर घोडेसवारी मुक्त फिरत निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. तर या निसर्ग सानिध्यात आपला सेल्फी घेऊन निखळ आनंद लुटला आहे.

पाचगणी पर्यटन स्थळी दिवाळी सुट्या सलग आल्याने पर्यटकानी चांगलीच गर्दी केली आहे. कालच लक्ष्मी पूजन पार पडले. त्यानंतर आज सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्याकरीता पर्यटन स्थळी दाखल झाले आहेत. या वर्षी दीपावली पर्यंत पाऊस चालू राहिल्याने निसर्ग सौंदर्य आजही पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण फिल देत आहे.

आज ही टेबल लँन्ड पावसाळी हिरवळ टिकून राहील आहे. हा गवताळ अंथरलेला गालिचा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. टेबल लँन्ड सोभावतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने  अधिकच खुलून गेला आहे. त्यातच टेबल लँन्ड वरून दिसणारे धोम धरण तसेच महू धरण जलशय याचे विहंगमय दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. तर टेबल लँन्ड येणार पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय रहात नाही.

टेबल लँन्ड हे आशिया खंडातील विस्तीर्ण अस दोन नंबरचे पठार असून पर्यटकांच्या आवडीचे पर्यटन स्थळ आहे. पाचगणी मध्ये येणाऱ्या पहिली पसंती या ठिकाणाला असते. येथे येणारा पर्यटक प्रथम टेबल लँन्ड वर फेरफटका मारल्याशिवाय राहत नाही..  

Web Title: During the Diwali season, the table land in Panchgani is crowded with tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.