सातारा झेडपीचे ३५ वे सीईओ ज्ञानेश्वर खिलारी; पदभार आज स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 08:58 PM2022-10-12T20:58:00+5:302022-10-12T21:03:15+5:30
विनय गौडा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होणार आहेत. तर सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. ते ३५ वे सीईओ म्हणून गुरुवारीच पदभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेने विविध अभियान, उपक्रमात राज्य तसेच देशपातळीवर नावलौकिक केला आहे. या पाठीमागे पदाधिकाºयांबरोबरच अधिकाºयांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. आतापर्यंतच्या सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्याच्या योगदानात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा नावलौकीक वाढेल असेच काम केले. त्यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. शुक्रवारी ते चंद्रपूरचा पदभार स्वीकारणार आहेत. तर गौडा यांच्या जागी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव या गावचे ज्ञानेश्वर खिलारी हे रहिवाशी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतून ते राज्यसेवेत आले. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. महसूलमध्ये त्यांचे काम चांगले राहिले आहेत. एक मनमिळावू अधिकारी म्हणून ते परिचीत आहेत. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते पुणे येथे सह नोंदणी महानिरीक्षक या पदावर होते. नूतन सीईओ खिलारी हे गुरुवारीच पदभार घेतील असे सांगण्यात आले.
विनय गौडा कर्नाटकातील...
२०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी विनय गौडा हे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे गाव मद्दुर तालुक्यातील गुरूनल्ली आहे. त्यांनी साताºयापूर्वी नाशिक येथे प्रोबेशनरी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यानंतर त्यांची याच पदावर सातारा जिल्हा परिषदेत बदली झाली होती.
हाफ फोटो दोन...
१२सातारा ज्ञानेश्वर खिलारी सीईओ
१२सातारा विनय गौडा सीईओ