उरमोडी नदीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 05:46 PM2018-04-27T17:46:17+5:302018-04-27T17:46:17+5:30
सातारा तालुक्यात सोनगाव-शेळकेवाडी हद्दीत उरमोडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शेंद्रे (सातारा) : सातारा तालुक्यात सोनगाव-शेळकेवाडी हद्दीत उरमोडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाण्यात बुडून मृत्यू झाला. अविनाश बाबूराव यादव (वय १५, रा. माचीपेठ, सातारा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा येथे राहणाऱ्या अविनाश यादव हा त्याच्या मित्रांसोबत सोनगाव-शेळकेवाडी येथील उरमोडी नदीत पोहण्यासाठी गेला होता. सर्वजण पोहत असताना अचानक तो नदीच्या खोल पात्रात गेला. नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहात त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने मुलांनी आरडाओरडा केला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. सातारा तालुका व बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अविनाश हा साताºयातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या भवानी हायस्कूलमध्ये नववी शिकत होता. सध्या शाळेला सुटी असल्याने तो पोहण्यासाठी गेला होता.