कोयनेजवळ भूकंप, केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:00 PM2019-09-25T14:00:24+5:302019-09-25T14:02:42+5:30
कोयना धरणाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास भूकंप झाला. हा भूकंप जाणवला नसलातरी त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर होता.
ठळक मुद्देकोयनेजवळ भूकंपकेंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर
सातारा : कोयना धरणाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास भूकंप झाला. हा भूकंप जाणवला नसलातरी त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर होता.
कोयना परिसरात गेल्या काही महिन्यात भूकंप होत आहे. काहीची तीव्रता समजून आली तर काहींचे धक्के जाणवले नाहीत. बुधवारी सकाळी ८ वाजून १९ मिनीटांनी भूकंप झाला.
त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर होता. तर केंद्रबिंदुची खोली ५ किलोमीटर असून तो काडोली गावाच्या पूर्वेला होता.