कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 01:28 PM2020-09-07T13:28:51+5:302020-09-07T13:31:51+5:30
कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता.
सातारा : कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता.
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. सोमवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनीटांनी २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कोयना परिसरातच हा अतिसौम्य प्रकारातील धक्का जाणवला. या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती.
कोयनेपासून १४.४ तर पाटण तालुक्यातील काडोली गावाच्या आग्नेयेस ६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कोयना परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. गेल्या काही महिन्यात अतिसौम्य प्रकारचे भूकंपाचे अनेक धक्के जाणवले आहेत. यामुळे कोठेही नुकसान झालेले नाही.