शहराच्या पूर्वेकडे आरक्षित पदे घुसविली!

By admin | Published: June 29, 2016 10:43 PM2016-06-29T22:43:42+5:302016-06-29T23:59:34+5:30

नगरपालिका आरक्षण : मातब्बर नगरसेवकांनी लॉबिंग केल्याची चर्चा; २७ जागांवर आरक्षण तर १३ जागा खुल्या प्रवर्गासाठी

In the east of the city, reserved seats! | शहराच्या पूर्वेकडे आरक्षित पदे घुसविली!

शहराच्या पूर्वेकडे आरक्षित पदे घुसविली!

Next

सातारा : पालिका निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण करताना आरक्षित पदे पूर्वेकडे घुसवून शहराचा पश्चिम भाग ‘सेफ’ करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. २० प्रभागांपैकी पूर्वेकडील १ व २ या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ नगरसेवक घुसविण्यासाठी काही मातब्बरांनीच लॉबिंग केल्याची कुजबुज सुरू आहे.
सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकीतून ४० नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापैकी २७ नगरसेवक हे आरक्षणातून पालिकेत निवडून जाणार आहेत. उर्वरित १३ जागांवर खुल्या प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळणार असल्याने आपल्या प्रभागात आरक्षणाचे पद पडू नये, यासाठी पालिकेतील काही मातब्बर पदाधिकाऱ्यांनी आपल्यावरचा ‘डेंजर झोन’ पश्चिमेकडून पूर्वेकडे ढकलल्याची चर्चा आहे.
शहरातील प्रभाग रचनेच्या अहवालाबाबत प्रशासनाने अत्यंत गोपनीयता पाळली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी सदस्यांच्या आरक्षण सोडतीनंतर प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सातारा पालिकेमध्ये मागील निवडणुकीतून ३९ नगरसेवक पालिकेत निवडून गेले होते. आगामी निवडणुकीत यामध्ये एका नगरसेवकाची भर पडणार आहे. अनुसूचित जातीचे पाच नगरसेवक निवडून जातील, त्यापैकी ३ महिला असतील.
इतर मागास प्रवर्गाचे ११ नगरसेवक निवडून जातील, त्यापैकी ६ महिला असतील. खुल्या प्रवर्गातून २४ नगरसेवक निवडून जातील, त्यापैकी ११ महिला असतील. ४० पैकी तब्बल २७ पदे ही आरक्षणाच्या माध्यमातून निवडली जाणार असल्याने उर्वरित १३ जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाचे नगरसेवकपद प्रभाग १ व २ कडे सरकवण्यात आले आहे. या खेळीमुळे पूर्वेकडच्या सदर बझार परिसरात तब्बल ३ नगरसेवक अनुसूचित जातीचे असण्याची शक्यता आहे. या खेळीमुळे पूर्व भागातून असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. साहजिकच ५ जुलै रोजी जोरदार हरकती घेतल्या जाऊ शकतात. (प्रतिनिधी)


३१ आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणी
शहरामध्ये पालिका निवडणुकीसाठी १० सप्टेंबर २०१६ रोजी मतदार यादी गृहीत धरली जाणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू राहील. त्यानंतर मतदार नोंदणी होणार नाही. साहजिकच मतदार नोंदणी नसणाऱ्यांना मतदान करता येणार नाही.


कऱ्हाडात प्रभाग चौदा; सदस्य एकोणतीस
कऱ्हाड : राज्यातील १९५ नगरपालिकांच्या डिसेंबरअखेर होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. या कार्यक्रमानुसार राज्यातील महत्त्वपूर्ण पालिका म्हणून ओळख असलेल्या कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रस्ताव मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता चौदा प्रभाग व एकोणतीस सदस्य संख्या झाली आहे.
कऱ्हाड शहराचा एकच नकाशा गृहित धरून झिकझॅक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाडला आता एकोणतीस सदस्यांचे चौदा प्रभाग पडले आहेत. त्यामध्ये दोन सदस्यांचे तेरा, तीन सदस्यांचे एक असे चौदा प्रभाग पडले आहेत. या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांमध्ये एकूण आठ जागा आहेत. त्यापैकी चार महिलांसाठी तर चार अनुसूचित जातींसाठी आहेत. त्यापैकी दोन महिलांसाठी राखीव आहेत. अन्य अशा एकूण पंधरा महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. याची सोडत २ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे.
राज्य शासनाने १९५ नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दोन सदस्यांचा एक प्रभाग निश्चित धरला जाणार आहे. यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेले
आहे.
नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना करताना ती झेड पद्धतीने करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यानुसार शहराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यातून पूर्वेकडे येऊन तेथून पश्चिमेकडे व तेथून दक्षिणेकडे शेवट या पद्धतीने होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the east of the city, reserved seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.