आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी शिक्षण संस्थांनी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:11 PM2017-10-04T23:11:53+5:302017-10-04T23:11:56+5:30

Education institutions should take responsibility for suicidal families | आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी शिक्षण संस्थांनी घ्यावी

आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी शिक्षण संस्थांनी घ्यावी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘केंद्र्र व राज्य शासनाच्या धोरणांना कंटाळलेला शेतकरी निराशाग्रस्त अवस्थेत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांची कुटुंबे कशी जगवायची? हा प्रश्न सध्या आहे. रयत शिक्षण संस्थेने या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले शिकविण्याचा विडा उचलला आहे. ही मुले आत्मविश्वासाने उभी राहावीत, यासाठी शिक्षण संस्थांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे,’ असे मत ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या ९८व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी मंत्री आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, उद्योजक फरोख कूपर, रामशेठ ठाकूर, ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पतंगराव कदम म्हणाले, ‘देशात परिवर्तनाची चळवळ उभी राहत आहे, त्याची मशाल खासदार पवारांनी हाती घ्यावी. ही सार्वत्रिक जनभावना आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम आपल्या सर्वांना करायला लागणार आहे.’
‘आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे मोठे काम आपल्याला करावे लागणार आहे,’ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Web Title: Education institutions should take responsibility for suicidal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.