शिक्षणामुळेच देश महासत्ता बनेल : शंकरराव गाढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:45 AM2021-09-14T04:45:37+5:302021-09-14T04:45:37+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात खंडाळा विभाग शिक्षण समितीने भरीव योगदान दिले आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून दुष्काळी भागात ...
खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात खंडाळा विभाग शिक्षण समितीने भरीव योगदान दिले आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून दुष्काळी भागात लावलेल्या या रोपाचा वटवृक्ष झाला आहे. त्यातूनच तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली. शिक्षणाचा हा वसा यापुढेही अविरत चालू राहील. भारताला महासत्ता करण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षण क्षेत्राची असल्याचे मत खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी व्यक्त केले.
बावडा (ता. खंडाळा) येथे मिटकॉन फाैंडेशनच्या सहकार्यातून उभारलेल्या राजेंद्र विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिटकॉन फाैंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बावडेकर, संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, सचिव अनिरुद्ध गाढवे, माजी सभापती एस. वाय. पवार, प्रसाद पवार, तेजस बावडेकर, संदेश बावडेकर, सरपंच गणेश पवार, महेश राऊत, नारायण पवार, गणपत पवार, अतुल पवार, रमेश पवार, परशुराम फडतरे, वैभव पवार, अंकुश पवार यांसह प्रमुख उपस्थित होते.
मिटकॉन फाैंडेशनने या शाळेचे संपूर्ण नूतनीकरण करून दिले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे. इमारतीमुळे शाळा स्वयंपूर्ण बनली आहे. या कार्यक्रमाचे प्राचार्य लक्ष्मण सोळसकर यांनी स्वागत केले. सुजित डेरे यांनी सूत्रसंचालन केले.
... .............................
फोटो मेल केला आहे .