वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपायोजना कराव्यात : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:21+5:302021-04-24T04:40:21+5:30
सातारा : वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे हे ...
सातारा : वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सातारा येथील वनविभाग कार्यालय वनविभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहा.वनसंरक्षक व्ही.जे. गोसावी, सहा.वनसंरक्षक एस.बी. चव्हाण, सहा.वनसंरक्षक के.एस. कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. ढोंबाळे आदी उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे निर्मिती करून मानवी वस्तीत पाण्याच्या शोधासाठी वन्य जीवांना येण्यापासून रोखणे शक्य होईल, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वनविभागास प्राप्त होणारा निधी व सेवा सुविधांसाठी होणारा संभाव्य खर्च आणि वनविभागाच्या इतर विषयांचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.