कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:43+5:302021-04-03T04:35:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी ...

Effectively enforce restrictions in the district related to corona infection | कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत बैठक गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

रात्री ८ नंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडे राहणार नाहीत, तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये शासनाने व प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळतात का, याची तपासणी संबंधित पोलीस स्टेशनने करावी. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असेल, त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करावी. बाजारपेठ, गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करत नसतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. नगरपालिका क्षेत्रात मोठ्या दुकानदारांनी कोराेनाची टेस्ट करूनच दुकानात बसण्याबाबत सांगावे. तसेच सायंकाळी मार्केटमध्ये रात्री ८ वाजता दुकान बंद करावे, असे माईकद्वारे पुकारून सांगावे. तसेच पोलीस विभागाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करावे.

प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हातांची स्वच्छता राखून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही देसाई यांनी या बैठकीत केले.

Web Title: Effectively enforce restrictions in the district related to corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.