कमी खर्चात खत निर्मितीसाठी पाऊल प्रयास ; सामाजिक संस्थेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:28 PM2018-12-25T23:28:42+5:302018-12-25T23:29:49+5:30
वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही ...
वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही अपेक्षा असते. तो कचरा आपण केलेला आहे, त्याची जबाबदारी आपलीसुद्धा आहे. हेच ओळखून कचरा व्यवस्थापनाच्या या सामाजिक जबाबदारीत प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी येथील प्रयास सामाजिक संस्थेकडून घरगुती ओल्या कचरा व्यवस्थापनासाठी कमी खर्चात खत निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कचरा हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. साधारण १.५ लाख टन कचरा भारतात रोज निर्माण होत आहे. एकट्या महाराष्ट्रात ९३ लाख टन कचरा वर्षाला तयार होतो. त्यातील ७५ लाख टन हा घरगुती स्वरुपाचा आहे. कचरा १०० टक्के वर्गी व विलगीकरण प्रक्रिया पुनर्वापरात आणणे गरजेचे आहे.
सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून वडूजमध्ये कचरा निर्मूलनासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. महिना पाच लाख दहा हजार रुपयांप्रमाणे ठेकेदाराला पैसे मोजावे लागत आहेत. हा खर्च आटोक्यात आणायचा असेल तर या संस्थेच्या धर्तीवरचे प्रयोग अंमलात आणणे गरज आहे. हा घरगुती प्रकल्प अर्धा ते एक किलो कचºयासाठी आहे. तसेच यापेक्षा जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी तयार होणाºयांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेकडून मार्गदर्शन मिळेल व जीवाणू कल्चर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन...
जाळीच्या बास्केट किंवा ट्रेला हिरवे नेट आतल्या बाजूने शिवून घ्या. बास्केटच्या तळाला दाभणाने एक छिद्र पाडून घ्या.
तळातल्या बाजूला सुरुवातीला थोड्या नारळाचे केसर किंवा झाडाची वाळलेली पाने अंथरूण घ्यावे.
त्याच्यावर दररोज अर्धा किलो कचरा टाकून त्यावर एक चमचा जीवाणू कल्चर टाकावे. ही प्रक्रिया दररोज करावी.
बास्केट हवेशीर जागी ठेवावी, साधारण ४० दिवसांनंतर खत वापरास येईल, बास्केटमधील वरचा थर बाजूला काढून तळातील बाजूचे खत काढून घ्यावे.
जीवाणू कल्चर वापरल्यामुळे बास्केटमध्ये हिट तयार होऊन कचºयाचे डिहायड्रेशन होऊन कचरा आकुंचन पावतो. त्यामुळे एक बास्केट किमान ४ ते ५ महिने भरत नाही.
तसेच जीवाणू कल्चर वापरामुळे या कचºयातून वास किंवा दुर्गंधी येत नाही.
जीवाणू कल्चर खर्च ३० रुपये दरमहा म्हणजेच १ रुपया प्रति दिवस एवढाच आहे.
साहित्य व खर्च
१ जाळीची प्लास्टिक बास्केट किंवा क्रेट - २०० रुपये,
१ मीटर नेट जाळीचे कापड - ३० रुपये,
जीवाणू कल्चर - दरमहा ३० रुपये